Categories: Previos News

कारवाईत ‘दौंड’ पोलीस ‘जोमात’, ‘यवत’ पोलीस मात्र अजूनही ‘कोमात’, त्या ठिकाणांवर कारवाई कधी!

दौंड / यवत : दौंड तालुक्यात दोन स्वतंत्र मोठी पोलीस ठाणी असून दोन्ही ठिकाणी पोलीस निरीक्षक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. मात्र काही दिवसांपासून दौंड पोलीस ठाणे हे सार्वजनिक ठिकाणी कारवाईच्या बाबतीत यवत पोलीस ठाण्यापेक्षा प्रभावीपणे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

दौंड पोलिस ठाणे हद्दीत बेशिस्त वाहन धारकांवर मोठ्या प्रमाणावर भादवी कलम 283 नुसार कारवाई केली जाऊन संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र यवत पोलीस ठाणे हद्दीत आणि मिनी शहर म्हणून उदयास आलेल्या केडगावमध्ये मात्र केडगाव, यवत पोलीस कारवाई करण्यास का धजावत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केडगावमध्ये दिवस रात्र बेशिस्तपणे वाहने चालवून नागरिकांना त्रास देणारी आणि बेशिस्तपणे कुठेही वाहने लावून रहादारीला अडथळा निर्माण करणारे अनेक महाभाग आणि टोळकीही आहेत. परंतु जी कारवाई दौंड शहरात आणि आसपास होताना दिसत आहे ती मात्र केडगाव आणि परीसरात दिसतच नाही.

पान टपऱ्या आणि तेथे वाहने उभी करून गुटख्याची पिचकारी आणि सिगारेटचे धूर सोडणारी टोळकी भविष्यात मोठी डोकेदुखी बनणार!

केडगाव स्टेशन येथील मोहन जनरल हॉस्पिटलच्या ओढ्या लगत दोन रस्ते असून एक रस्ता हा स्मशानभूमी व्हाया जवाहरलाल विद्यालयाकडे जातो तर दुसरा रस्ता हा हंडाळवाडी आणि खुटबाव या गावांकडे जातो. स्मशानभूमी, जवाहरलाल रस्त्या लगत काहींनी रस्त्यावर पान टपऱ्या टाकल्या असून या पान टपऱ्यांच्या आजूबाजूला व मुख्य रस्त्यामध्येच मोठ्या प्रमाणावर दुचाक्या लावून येथे युवा वर्ग गुटखा खाऊन लाल पिचकाऱ्या आणि सिगारेटचा धूर हवेत सोडताना पहायला मिळत असतात. येथे रस्त्यालगतच पान टपरीवर छपरी मुलांकडून रस्त्यात गाड्या लावण्यात आल्याने आपल्या दैनंदिन गरजेसाठी केडगाव स्टेशनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तसेच शाळकरी मुला, मुलींना या वाहनांचा आणि येथील टोळक्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असतो.

जर या वाहनचालकांना इतरांनी ही वाहने बाजूला घ्या, रहदारीस अडचण येत आहे असे सांगितल्यास त्या वाहनचालकांकडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाच दादागिरीची भाषा वापरली जाते, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादावादी होण्याची आणि त्याचे पर्यावसन मोठ्या हाणामारीत होण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी आणि केडगाव स्टेशमध्ये विविध ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर आणि त्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली नागरिकांची भीती सत्यात उतरल्यास यास पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

6 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago