Categories: क्राईम

‘गोहत्या’ करून ‘गोमांस’ विक्री करणाऱ्या अड्ड्यावर दौंड पोलिसांची ‘धाड’, ‘चौघांवर’ गुन्हा दाखल तर एकाला अटक, 4 लाखाचा मुद्देमालही हस्तगत

दौंड : दौंड शहरातील इदगा मैदान परिसरात गोहत्या करून गोमांस विक्री साठी रवाना होत असल्याची खबर बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळताच त्यांनी दौंड पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर धाड टाकून कारवाई केली.

या कारवाईत एका आरोपीला रंगे हात पकडण्यात आले असून इतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. दौंड पोलिसांनी सदर धंद्याचा मूळ मालक इद्रिस अबिद कुरेशी (रा. कुरेशी गल्ली दौंड) सह किरण पांडुरंग कुंभार (रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस जिल्हा सोलापूर), मुश्रीफ कुरेशी, बबलू कुरेशी (रा. बारामती) यांच्या विरोधात गोवंश हत्या (सुरक्षा) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा 1995 , भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दौंडमध्ये ईदगाह मैदान परिसरातील कत्तलखान्यात इद्रिस आबिद कुरेशी जनावरांची कत्तल करून त्यांचे गोमांस विक्री साठी पाठविणार असल्याची खबर बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ, शहरात रात्रीच्या गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस उपनिरीक्षक सुनिता चवरे व पथकास सोबत घेऊन शहरातील इदगा मैदान परिसरातील या बेकायदेशीर कत्तलखान्यावर धाड टाकली. व त्या ठिकाणाहून कत्तल केलेल्या जनावरांचे मांस,7 जिवंत जनावरे व दोन चार चाकी वाहने असा 4 लाख 2 हजार 910 रु.चा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेली जनावरे बोरमलनाथ येथील गोशाळेत पाठविण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,पो. निरीक्षक विनोद घुगे,पो. उप. निरीक्षक सुनिता चवरे,पो. कर्मचारी विकास गावडे, पांडुरंग थोरात, महेंद्र लोहार, निखिल जाधव,अमीर शेख, रवींद्र काळे, योगेश गोलांडे, सुरेश चौधरी या पथकाने कारवाई केली.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago