येरवडा जेलमधून फरार झालेला 7 गंभीर गुन्ह्यांतील कुख्यात आरोपी ‘अक्ष्या चव्हाण’ दौंड पोलिसांनी पकडला

दौंड : दौंड पोलिसात सात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला मोक्यातील खतरनाक आरोपी कोरोना काळात येरवडा जेल मधून फरार झाला होता. त्या खतरनाक आरोपीला दौंड पोलिसांनी एका धाडसी कारवाईत जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे. अक्ष्या उर्फ अक्षय कोंडक्या चव्हाण(वय 22,रा. माळवाडी, दौंड) असे अटक आरोग्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार अक्ष्या चव्हाण याच्या विरोधात दौंड पोलिसात सण 2015 ते सन 2020 दरम्यान सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्यानुसार त्याच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार( मोका) कारवाई करून त्याची रवानगी येरवडा( पुणे) जेलमध्ये करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात 16 जुलै 2020 रोजी येरवडा जेलमधून पाच कैदी फरार झाले होते त्यामध्ये अकशा सहित दौंडच्या आणखीनही दोन आरोपींचा त्यामध्ये समावेश होता. तेव्हापासून दौंड पोलीस या फरार आरोपींच्या मागावर होते.अकशा हा त्याच्या माळवाडी येथील घरी जात येत असल्याची पक्की खबर दौंड पोलिसांना मिळाली.दि.4 मार्च रोजी पो.नि. विनोद घुगे व पोलीस पथकाने रात्री गस्तीच्या दरम्यान त्याच्या घरी छापा मारला व त्याला बेड्या ठोकल्या. या खतरनाक आरोपीला सहज पकडणे तसे शक्य नव्हते, तो इतका चपळ होता की 4-5 पोलिसांना ऐकत नसे त्यामुळे त्याची खबर मिळताच पो.नि. घुगे यांनी त्याला जेरबंद करण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध प्लॅन आखल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे,सहा. पो. निरीक्षक तुकाराम राठोड, पो.उपनिरीक्षक शहाजी गोसावी,सुशील लोंढे व कर्मचारी यांनी कारवाई केली.