दौंड : विविध ठिकाणी दरोडे टाकून मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दौड पोलीसांकडुन जेरंबद करण्यात आली असून दौंड पोलिसांनी आत्तापर्यंत 14 लाखांचे 101 मोबाईल जप्त केले असून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
आज दिनांक 24 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्यात ड्युटीवर असणारे ठाणे अंमलदार सहा पोलीस फौजदार महेंद्र गायकवाड यांना दौड शहरातील अमर सोसायटी येथून मोबाईल चोरून नेलेबाबतची माहीती मिळाली होती.
मोबाईल चोरीतील आरोपी हे सुनिल गणपत जानक (रा.गणेश सोसायटी सरपंचवस्ती, दौड) यांचे राहते घरी चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करून दरोडा टाकतानाची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी महेंद्र गायकवाड यांनी याबाबत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना तात्काळ माहिती देत त्यांच्या सुचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकासह संशईत ठिकाणी गेले. तेथे संशईत 6 इसम त्यांना आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले असता त्या आरोपिंनी आपली नावे सोमरा नगर मोदी (वय २६ वर्षे, रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड) आकाश दिलीप मोदी (वय २५ वर्षे रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड) नंदन नगर मोदी (वय २२ वर्ष रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड) असे असल्याचे सांगीतले तसेच त्यांच्या टोळीमध्ये आणखी ३ इसमही असल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोपिंनी विवो, ओप्पो, सॅमसंग, रेडमी, एम. आय. रिअल मी, पॅनासॉनिक, पोको, टेक्नो, होनर, अॅसुस, लिनीओ, जिओ, वन प्लस, आय फोन, नाझरा या कंपनीचे मोबाईल इटारशी, अमरावती, नागपुर, जळगाव, भुसावळ, नाशिक या ठिकाणाहून चोरून आणलेले असल्याचे सांगत आम्ही दरवर्षी महाराष्ट्रात पालखीमध्ये सामील होवुन मोबाईल चोरी करून ते झारखंड येथे घेऊन जावुन विक्री करीत असल्याचे सांगीतले.
वरील आरोपिंकडून 14 लाखाचे एकूण 101 मोबाईल रिकव्हर करण्यात आलेले आहेत. ताब्यात घेतलेल्या ६ इसमांवर दौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या टोळीमध्ये आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे आणि त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे किती ठिकाणी केले आहेत याबाबत सखोल तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद घुगे पोलीस निरिक्षक (दौंड पोलीस स्टेशन) तुकाराम राठोड, सहा पोलीस निरिक्षक, सतिश राउत, पोलीस उपनिरिक्षक, सहा पोलीस फौजदार डि.जी. भाकरे, सहा पोलीस फौजदार महेंद्र गायकवाड, सहा.फौजदार संभाजी साळुंखे, पो.हवा पांडुरंग धोरात, पो. हवा.सुभाष राऊत, पो.ना. अमोल गवळी, अमीर शेख, शरद वारे, आदेश राऊत, पो.ना. विशाल जावळे, पो. कॉ. अमोल देवकाते, अमजद शेख, योगेश गोलांडे, अभिजित गिरमे, रवींद्र काळे, किशोर वाघ, प्रदीप गोयकर (रेल्वे पोलीस) ट्रॅफिक वाईन नाना उबाळे यांच्या पथकाने केली आहे.