दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला बोरिपार्धी येथे किरकोळ वादातून पिस्तूलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत बंडू उर्फ आप्पा राणू कोळपे (रा.चौफुला ता.दौंड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ता. २९/११/२०२२ रोजी रात्री ७:१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र राजु भोसले (रा. बोरीपार्धी चौफुला, ता. दौंड, जि. पुणे) हे दोघे चौफुला येथील शिवानंद रेस्टॉरंट बार ॲण्ड लॉजिंग येथे जेवण करण्यासाठी गेले होते. दोघे जेवन करून हॉटेलचे बाहेर आले त्यावेळी अक्षय शिंदे व त्याच्या जोडीदार आणि मच्छिन्द्र दिवेकर, साहील शेख, (दोघे रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यामध्ये बाचाबाची चालु होती. यावेळी अक्षय शिंदे व त्याचा साथीदार यांनी आप्पा तुम्ही मच्छिंद्र दिवेकर, साहील शेख यांना सांगा, हे दोघे माझे सोबत विनाकारण शिवीगाळ, दमदाटी करीत असल्याचे म्हटले.
यावेळी फिर्यादी यांनी मच्छिंद्र दिवेकर, साहील शेख यांना म्हणाले की कशाला भांडणे करता त्यावेळी मच्छिंद्र दिवेकर याने फिर्यादी यांना जवळ कोण आहेस तु, आप्या तुला आता बघतोच असे म्हणत असताना त्याच्यासोबत असलेल्या साहील शेख याने फिर्यादीस आई, बहीणीवरून शिवीगाळ करायला सुरवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी मी तर तुमची भाडणे मिटवत आहे, तुम्ही मला कशाला शिवीगाळ, दमदाटी करताय असे म्हणाले असता साहील शेख याने त्यांच्या कानाखाली मारून, लाथाबुक्यांनी मारहाण केली तर मच्छिन्द्र दिवेकर याने त्याच्या खिशातुन पिस्तूल काढून आप्या तुला आता जिवंत सोडणार नाही असे म्हणून खिशातून पिस्तूल काढला. या प्रकाराने फिर्यादी व त्यांचा मित्र राजु भोसले हे घाबरून हॉटेलकडे पळुन जात असताना मच्छिंद्र दिवेकर याने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने एकगोळी फायर केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र राजु भोसले यांना हॉटेलचे मालक कपील अरूण गायकवाड यांनी हॉटेलमध्ये घेऊन हॉटेलचे शटर बंद केले.
मात्र मच्छिंद्र दिवेकर यांने आप्या बाहेर ये, आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन आणखी एक गोळी फायर केली. तर साहील शेख मोठमोठयाने शिव्या देत मच्छिंद्र दिवेकर यास आप्या काय नेता लागुन गेला काय, आप्याला आज जिवंत सोडायचे नाही असे म्हणत असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घडलेल्या घटनेनंतर हॉटेलचे मालक कपील अरूण गायकवाड यांनी फिर्यादी व त्यांचा मित्र राजु भोसले या दोघांना हॉटेलच्या पाठीमागील बाजुने बाहेर काढुन दिले. घडल्या प्रकारामळे फिर्यादी घाबरून गेल्याने त्यांनी उशीरा येऊन तक्रार दिल्याचे म्हटले आहे. यवत पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी आरोपी १) मच्छिंद्र बापुराव दिवेकर, २) साहील इस्माईल शेख (दोघे रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.