अख्तर काझी
दौंड : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी 8 डिसेंबर पर्यंत अधिकाधिक विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले होते. त्या अनुषंगाने येथील दौंड कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दि. 5 डिसेंबर रोजी 18 ते 19 व 20 ते 21 या वयोगटातील युवकांचे मतदार नोंदणी शिबिराचे पार पडले.
शिबिरामध्ये मतदार नोंदणी अधिकारी तथा दौंड चे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले, महाविद्यालयाचे प्राचार्य जंगले, उपप्राचार्य सुनील वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दौंड चे तलाठी एच.टी.फरांदे, नगरपालिकेचे हनुमंत गुंड तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मतदान प्रक्रियेत 18 ते 19 व 20 ते 21 वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी असल्याने युवा लोकसंख्येच्या मतदार नोंदणीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महाविद्यालयात 100% मतदार नोंदणी होईल याकडे लक्ष द्यावे, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन मतदार नोंदणी अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन मिनाज मुल्ला यांनी केले.