Categories: Previos News

दौंड नगरपालिकेच्या कारभाराविरोधात बहुजन समाज पार्टीने केले एक दिवसीय धरणे आंदोलन

दौंड : दौंडकर नागरिक नगरपालिकेचा असणारा कर भरून सुद्धा त्यांना नगरपालिकेकडून आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा मिळत नाहीत, त्यामुळे येथील सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे असा आरोप करीत दौंड, बहुजन समाज पार्टीने दौंड नगरपालिका कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी अभिजीत डेंगळे, भागवत भोसले, उमाकांत कांबळे, विशाल सोनवणे, हर्षल पाटोळे, वाहिद सय्यद, अमीन शेख, गोरख ननावरे, अमन खान, सुनील शिंदे, अंबादास पोळ, सचिन काकडे आदी उपस्थित होते.

पक्षाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले, निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड शहरामध्ये महिलांसाठी एकही सार्वजनिक शौचालय नाही, या गैरसोयीमुळे येथील महिला वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील सिद्धार्थ नगर व शिवाजी चौक परिसरातील रस्त्या कामाला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक वास्तू हटवून सुद्धा या ठिकाणचे रस्त्याचे काम अपूर्ण व धोकादायक स्थितीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. ज्यामुळे अपघात होऊन जीवितहानीचा धोका निर्माण होत आहे.

तसेच शहरात फिरणाऱ्या जनावरांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, शहरातील नागरि वस्त्यांमध्ये असणारी तुंबलेली गटारे साफ करावीत, दिव्यांग बांधवांसाठी असणारा निधी सन 2010 ते 2015 असा पाच वर्षाचा निधी नगरपालिकेमध्ये शिल्लक असून तो शहरातील दिव्यांग बांधवांच्या खात्यावर त्वरित जमा करावा. या मागण्या पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago