Categories: राजकीय

‛कुल’ गटाचे खंदे समर्थक ‛राजेश गायकवाड’ यांची ‛थोरात’ गटावर स्तुतीसुमणे, ‛त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी ‛खळबळ’

मी सदैव कटिबद्ध आहे आपल्या सर्वांगीण विकासासाठीराजेश गायकवाड

दौंड : दौंड शहरातील ‛कुल’ गटाचे खंदे समर्थक आणि नगरसेवक तथा दौंड न.पा तील गटनेते राजेश गायकवाड यांच्या एका पोस्टने दौंड शहरात मोठी खळबळ माजवली आहे. तसेच राजेश गायकवाड यांनी स्वतः मीडियाला हि पोस्ट पाठवली असून या पोस्टमध्ये आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडुन दिलेल्या जनतेसाठी सर्व संकटांशी लढुन पुणे जिल्हा नियाेजन मंडळातुन आत्तापर्यंत तब्बल १ काेटी ७७ लाख रु. निधी मंजुर झाला असल्याचे जाहीर करीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार रमेश थोरात आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य वीरधवल जगदाळे पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

राजेश गायकवाड यांनी आपल्या पोस्टमध्ये मंजुर झालेल्या निधीतुन प्रभागात विकासकामे दाखवताना
१) सेन्ट सेबेस्टिन चर्च हायमास, २)नार्टन कब्रस्तान हायमास, ३)अँन्थोनी चर्च हायमास
४)चर्च ऑफ क्राइस्ट हायमास, ५)यादव वस्ती ते नार्टन चर्च ते जाधव आपार्टमेंट पथदिवे 50
6) स्विमिंगपुल परिसर पथदिवे 26
७)संस्कार नगर पथदिवे 32, ८)फादर हायस्कूल ते भाग्यश्री आंगण रस्ता डांबरीकरण करणे, ९)ख्रिस्त सेवा मंदिर ते पसी घर रस्ता डांबरीकरण करणे, १०)जुडी मिस घर ते पुरंदरे घर रस्ता डांबरीकरण करणे
११)रेमंड डायस घर ते गुलमोहर अपार्टमेंट ते तिवारी घर रस्ता डांबरीकरण करणे या कामांचा उल्लेख करीत या कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात तसेच पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य वीरधवल जगदाळे यांनी पक्षपात न करता मोलाचे सहकार्य केले असल्याचे नमूद करून त्याबद्दल तमाम जनतेच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो असे नमूद केले आहे. राजेश गायकवाड हे ‛कुल’ गटाचे खंदे समर्थक असताना त्यांनी ‛थोरात’ गट आणि ‛राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाचे केलेले गुणगान हे आगामी निवडणुकीत बंडखोरीची चाहूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago