दौंड नगरपरिषदेने आयोजित केले ‘टाकाऊ’ वस्तुपासून बनविलेल्या ‘टिकाऊ’ वस्तूंचे प्रदर्शन, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्या हस्ते उद्घाटन

दौंड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत दौंड नगर परिषदे च्या वतीने स्वच्छ अमृत महोत्सवाच्या (2022) निमित्ताने टाकाऊ वस्तु पासून बनविलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील सर्वच शालेय विद्यार्थ्यांना नगरपरिषदेने प्रदर्शन पाहण्याचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांनीही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रदर्शन पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली. शिशु विकास मंदिर, स्वर्गीय लाजवंती गॅरेला हायस्कूल, नवयुग प्राथमिक शाळा, संस्कार स्कूल, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय, मातोश्री पार्वती बाई कुंभार प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या याची माहिती घेतली.

प्रदर्शनामधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेचा वापर करून बनविलेल्या टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू अत्यंत कौतुकास्पद होत्या. नगर परिषदेच्या उप -मुख्याधिकारी सुप्रिया गुरव, उपक्रमाच्या नोडल अधिकारी तृप्ती साळुंखे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.