Categories: राजकीय

‘आमदार राहुल कूल’ यांच्या रूपाने दौंड’ला ‘मंत्रिपद’! दौंडकरांना 75 वर्षांनंतर न्याय मिळणार, ‘मंत्रिपद’ मिळण्याची ही आहेत महत्वाची 5’ कारणे

अब्बास शेख

पुणे : राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गड मिळून सत्तास्थपनेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य 10 ते 12 खात्यांची मंत्रीपदे देण्यात येणार असून यात काही महत्वाच्या खात्यांचाही समावेश असणार आहे तर भाजपकडे मुख्यमंत्रिपद आणि अन्य खात्यांची मंत्रीपदे राहणार असून यात दौंडचे आमदार राहुल कूल यांना राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कूल आणि पर्यायाने दौंड तालुक्याला राज्यमंत्रिपदाने अखेर 75 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे. जसा भारत देश स्वतंत्र झाला तशी दौंड तालुक्याच्या वाट्याला राजकीय उपेक्षाच आली आहे. पाणी, रस्ते, दळणवळणाची मुख्य साधने असणारी रेल्वे, हायवे आणि मोठमोठ्या बाजारपेठा हे सर्व असूनही दौंड तालुक्याला कायमच डावलले गेले. दौंड तालुका हा कृषी प्रधान आणि औद्योगिक हब असणारा तालुका असूनही या तालुक्याला गेल्या 75 वर्षांमध्ये एकदाही मंत्रिपद दिले गेले नाही ही मोठी शोकांतिका आहे.

मात्र आता दौंडकरांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राज्यात येणाऱ्या भाजप सरकारमध्ये दौंडचे आमदार राहुल कूल यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून मिळत आहे.

आमदार ‘राहुल कूल’ आणि पर्यायाने दौंडला मंत्रिपद मिळण्याची ही महत्वाची 5 कारणे आहेत.
1) आमदार राहूल कूल यांची विशेष कामाची पद्धत, उच्च शिक्षण आणि स्वतः वकील असल्याने प्रत्येक गोष्टीचा बारीक अभ्यास, तालुका आणि जिल्ह्यातील राजकारणाचा गाढा अभ्यास, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील राहून वरिष्ठ पातळीवर विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी अहोरात्र केलेली मेहनत.
2) गेल्या 75 वर्षांमध्ये कधी दौंड तालुक्याला मंत्रिपद मिळाले नाही, बारामती, इंदापूर,पुरंदर अश्या बाजूच्या तालुक्यांना अनेकवेळा मंत्रिपदे मिळाली मात्र दौंडची उपेक्षा आणि त्यामुळे 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी दौंडकरांना आव्हान केले होते ‘तुम्ही मला आमदार द्या’, ‘मी तुम्हाला मंत्रिपद देतो’.
3) संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची लाट असताना त्यामध्ये बारामतीच्या बांधावरून निवडून आलेले एकमेव भाजप आमदार.
4) नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्यनिधीचा पाठपुरावा केला आणि आरोग्यनिधी आणून केवळ पैसे नाही म्हणून मरणाच्या दारात पोहोचलेल्या रुग्णांना मरणाच्या वाटेतून बाहेर काढण्यासाठी केलेले मोलाचे प्रयत्न आणि त्यातून जनतेने दिलेली ‘आरोग्यदूत’ ही पदवी
5) राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिविश्वासू सहकाऱ्यांपैकी एक अशी ओळख, विकासकामांसाठी कायम पाठपुरावा करणारे आमदार म्हणून त्यांची मंत्रालयात बनलेली ओळख.

आमदार राहूल कूल आणि पर्यायाने दौंड तालुक्याला मंत्रिपद मिळण्याची अजूनही बरीचशी कारणे असून त्याचा लेखाजोखा पुढील भागात आपण पाहणार आहोतच मात्र दौंडतालुक्याला मंत्रिपद मिळण्यास इतकी वर्षे का लागली हे न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago