अख्तर काझी
दौंड : दौंड नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत “ मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर ” अभियान राबवले जात असून या अभियानांतर्गत दौंड शहरात RRR म्हणजेच (रिड्यूस,रीयुझ,रिसायकल) केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
केंद्राच्या माध्यमातून घरातील अनावश्यक वस्तू जसे की वापरलेल्या चप्पल, वापरलेले कपडे, वापरलेली भांडी, वापरलेली पुस्तके, वापरलेली खेळणी इत्यादी वस्तूंचा पुनर्वापर केला जाणार असून कचरा कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. शहरातील १) जुनी नगरपरिषद (हुतात्मा चौक ) दौंड २) नगरपरिषद टाऊन हॉल,दौंड.
३)जुने वाचनालय, गांधी चौक, दौंड इत्यादी ठिकाणी RRR केंद्र उभारण्यात आले आहे.
दौंडकरांनी घरातील अनावश्यक कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, चप्पल इ. वस्तू वरील RRR केंद्रावर जमा करून सदर उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दीपक म्हस्के, शुभम चौकटे, गणेश ओहोळ, हरेश बनसोडे यांना संपर्क करण्यात यावा.
संपर्क :९१५६०३३५८१,
७०२८८८७४५०,
९१७५२६३३७५,
९८९०५१०१०३.