Categories: Previos News

दौंड : कुरकुंभचे सरपंच, उपसरपंच यांचे सदस्यत्व रद्द..! विभागीय आयुक्तांचा निकाल

पुणे /दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील विद्यमान सरपंच राहुल भोसले व उपसरपंच विनोद शितोळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल पुणे विभागीय आयुक्तांनी दिला असल्याची माहिती अपिलकर्त्यांचे वकील ॲड. शशिकांत सोनवणे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी निकालाची प्रतही माध्यमांना पाठवून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुरकुंभ ग्रामपंचायतचे सरपंच राहुल भोसले व उपसरपंच विनोद शितोळे या दोघांविरुद्ध अपिलकर्ते संदीप भागवत आणि संदीप साळुंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारींमध्ये निवडणुकीचा खर्च अवैधरित्या केला असल्याचे आणि शासनाचे निर्देश आणि नियमांचे उल्लंघन करून हा खर्च करण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे अपिलार्थी संदीप भागवत आणि संदीप साळुंके यांनी ॲड. शशिकांत सोनवणे यांच्यामार्फत पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते.

यावेळी पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल रद्द करून यातील सर्व बाबी तपासणी अंती खर्चाबाबत त्यांना चुकीच्या पद्धतीने खर्च दाखवल्याचे निदर्शनास आल्याने विद्यमान सरपंच राहुल भोसले व उपसरपंच विनोद शितोळे यांचे सदस्यत्व पद रद्द करण्यात आल्याचा निकाल दिला आहे.

याबाबत कुरकुंभ चे सरपंच राहुल भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, अजून मला या निकलाबाबत कोणतेही पत्र मिळाले नसून त्यामुळे याबाबत सध्यातरी काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago