संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विशेष
दौंड : अब्बास शेख
दौंड च्या पंचायत समिती आरोग्य विभागाने “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” या घोषवाक्यासह आषाढीवारी २०२५ च्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठी आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज झालेले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती, दौंड डॉ.उज्वला जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार,
दौंड पंचायत समितीच्या आरोग्यविभागाकडून वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्यविषयक सेवा सुविधा तसेच आरोग्य शिक्षण, जनजागृती विषयक माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
दिनांक २३ जून २०२५ ते २५ जून २०२५ असा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील ५१ किलोमीटरचा प्रवास असणार आहे. हा प्रवास बोरीभडक, चंदनवाडी ते गुंजखीळा असा असणार असून तालुक्यातून ४ प्राथमिक आरोग्य कैद्राच्या कार्यक्षेत्रामधून पालखी सोहळा मार्गस्थ होत आहे. दौंड तालुक्यातील पालखी सोहळ्याचा प्रवास हा ३ दिवस आणि २ रात्री असा असून पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम हा यवत येथे दिनांक २३/०६/२०२५ ला होणार आहे तर दुसरा मुक्काम हा दि. २४/०६/२०२५ रोजी वरवंड येथे होणार आहे. सदर पालखी सोहळ्याची पूर्व तयारी करण्यासाठी दौंड पंचायत समितीच्या आरोग्यविभागाने गेल्या ३ आठवड्यापासून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत पालखी मार्गावर १३ टप्यामध्ये विविध आरोग्य पथके कार्यरत केली आहेत.
पालखी मार्गावर खालीलप्रमाणे आरोग्य विषयक सेवा, सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
- आरोग्य विभागाकडून एकूण २४२ इतके मनुष्यबळ (वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी) यांच्यामार्फत पालखी मार्गावर, आवश्यकतेनुसार वारकन्यांना मोफत तपासणी व औषध उपचार करून आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत.
- एकूण 48 किलोमीटर प्रवासादरम्यान एकूण २४ वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असून प्रत्येकी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर एक वैद्यकीय पथक या प्रमाणे मोफत सेवा देणार आहोत.
- एकूण २५ रुग्णवाहिकामार्फत (१०२/१०८) पालखी मार्गावर २४/०७ पध्दतीने संदर्भसेवा व आपत्कालीन सेवा पुरविण्यात येणार आहे.
- एकूण १३ हिरकणी कक्षाची स्थापना पालखीमार्गावरील आरोग्यसंस्थेच्या ठिकाणी व पालखी तळावर करण्यात येणार आहे.
- पालखी मुक्काम असणाऱ्या ठिकाणी अनुक्रमे ग्रामीण रुग्णालय यवत येथे ५ बेडचा अतिदक्षता विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंड येथे ३ बेड चे अतिदक्षता विभाग उभारण्यात आले आहेत.
- तसेच सर्व आरोग्यसंस्थामध्ये अत्यावश्यक औषधसाठा त्यामध्ये प्रामुख्याने (श्वानदेश व सर्पदंश इ.) औषधे उपलब्ध आहेत.
- पालखी मार्गांवरील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना १० टक्के बेड आपत्कालीन सेवांसाठी राखीव ठेवणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहे.
- पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्या अंतर्गत कामगारांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकार्यामार्फत करण्यात आलेली असून कामगारांना स्वच्छतेबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आलेले आहे.
- पालखी मार्गावरील एकूण १८५ पाणी स्त्रोतांचा शुद्धीकरण करून तपासणी करिता राज्य प्रयोगशाळा पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
- पालखी मार्गावरील एकूण १३ ग्रामपंचायतीचे विरंजक चूर्ण तपासणीसाठी पाठवले असता राज्य प्रयोगशाळा पुणे यांच्याकडून गुणवत्ता दर्शक अहवाल प्राप्त झालेला आहे.
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामधील शासकीय व खाजगी एकूण २१० टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पालखी मार्गावरील एकूण १० ठिकाणी टँकर भरणा केंद्र उपलब्ध करण्यात आले असून, त्याद्वारे वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात येणार आहे.
- आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत आठवड्यापासून जलजन्य, कीटकजन्य आजारांचे सर्वेक्षण व जनजागृती करण्यात आलेली आहे.
- जिल्हा हिवताप कार्यालय पुणे ग्रामपंचायत मार्फत यवत, वरवंड या पालखी मुकामाच्या ठिकाणी धूर फवारणी केली जाणार आहे अशी सविस्तर माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी दिली आहे.