दौंड : दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यावर सलग दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना भादवी कलम 307,354,325, आर्मॲक्ट आणि ॲट्रॉसिटी या गुन्ह्यात मागील महिन्यात त्यांना जामिन मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांच्या मुलावर दाखल झालेल्या 376 च्या गुन्ह्यामध्ये बादशहा शेख यांच्यासह त्यांची पत्नी, दोन सुना आणि लहान मुलाला सहआरोपी करण्यात आले असल्याने कारागृहातील त्यांचा मुक्काम वाढला होता. मात्र आता या गुन्ह्यातही त्यांना बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून दोन्ही गुन्ह्यात जामिन मंजूर झाल्याने बादशहा शेख यांची कारागृहातून बाहेर येण्याची वाट मोकळी झाली आहे.
दौंड चे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. बादशहा शेख यांनी ॲड. समीर शेख आणि ॲड.अझहरुद्दीन मुलाणी यांच्यामार्फत बारामतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात अगोदर अटकपूर्ण जामिन अर्ज केला होता मात्र तो फेटाळला गेल्याने बादशहा शेख यांना अटक झाली होती. बादशहा शेख यांना अटक झाल्यानंतर ॲड. समीर शेख व ॲड. अझहरुद्दीन मुलाणी यांनी बारामती न्यायालयात जामिन अर्ज दाखल करत बादशहा शेख यांना जामिन मिळावा यासाठी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता. आरोपिंच्या वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरत बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने बादशहा शेख यांना अगोदर पहिल्या गुन्ह्यात जामिन मंजूर केला होता.
पहिल्या गुन्ह्यातील जामिन मंजूर झाल्यानंतर वकिलांकडून बादशहा शेख यांचा दुसऱ्या गुन्ह्यातील जामिन मांडण्यात आला. यावेळी ॲड. समीर शेख यांनी न्यायालयात पुन्हा जोरदार युक्तिवाद करत बादशहा शेख यांना जामिन मिळण्याची मागणी केली. यावेळी ॲड. अझहर मुलाणी यांनी त्यांना या कामात मदत केली. न्यायालयाने वकिलांचा युक्तिवाद ऐकूण काही अटी आणि शर्थिंवर बादशहा शेख यांना जामिन मंजूर केला आहे.
या गुन्ह्यातील इतर आरोपिंना दि.9 फेब्रुवारी रोजीच हायकोर्टातून जामिन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी आरोपिंच्यावातीने ॲड. नितीन गवारे पाटील यांनी काम पाहिले होते. मुंबई हायकोर्टमध्ये जामिन झालेल्यांमध्ये बादशहा शेख यांची पत्नी, दोन सुना आणि एका मुलाचा समावेश होता.