Categories: Previos News

Daund : कोरोना रुग्णांवर उपचार नाकारणाऱ्या खाजगी दवाखान्याच्या प्रमुखावर FIR, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.डांगे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून दौंड प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या शहरातील खाजगी दवाखान्याने बाधित रुग्णांना उपचार देण्यास नकार दिल्याने संबंधित दवाखान्याचे प्रमुखांवर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबतची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार डी.जी.भाकरे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे मात्र अन्य खाजगी दवाखान्यांचे धाबे दणाणले आहेत. 

या प्रकरणा बाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.३ ऑगस्ट रोजी  येथील  उपजिल्हा  रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी कोरोना संसर्ग प्रादुर्भाव झालेल्या तीन  रुग्णांना उपचारासाठी शासनाने अधिग्रहित केलेल्या येथील पिरॅमिड या खाजगी दवाखान्यात पाठविले असता दवाखान्याचे प्रमुख डॉ. समीर  कुलकर्णी यांनी या रुग्णांना दवाखान्यात दाखल करून उपचार देण्यास नकार दिला, त्यामुळे डॉ. डांगे यांनी डॉ.समीर कुलकर्णी यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दौंड पोलिसांनी डॉ डांगे यांच्या या तक्रारीवरून डॉ समीर कुलकर्णी (रा.दौंड,जि.पुणे) यांच्या  विरोधात साथीचे रोग अधिनियम १८६०, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड सहिता१८६०( कलम १८८,२६९) अन्वये  गुन्हा दाखल केला आहे. 

डॉ डांगे यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की, बाधित रुग्णांपासून कोरोना विषाणू संसर्ग पसरतो हे  माहित असताना सदरच्या रुग्णांना पिरॅमिड दवाखान्या ने उपचारार्थ दाखल करून न घेता त्यांचेवर औषधोपचार केलेले नाहीत. मा.उपविभागीय अधिकारी यांचे आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे आदेश पाळलेले नाहीत. पिरॅमिड दवाखान्याच्या आदेश न पाळण्याच्या  कृतीने, हलगर्जीपणामुळे व संसर्गजन्य रुग्णास दवाखान्याच्या बाहेर ठेवल्याने कोरोना सारख्या संसर्गजन्य रोग प्रसारित होण्यास मदत झाली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या अशा खाजगी रुग्णालयांवर कारवाई व्हावी अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी सुद्धा केली होती.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago