दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमदार ‛राहुल कूल’ यांच्या हस्ते डायलिसिस युनिटचे लोकार्पण

दौंड : दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमदार राहुल कुल यांच्या हस्ते डायलिसिस युनिटचे लोकार्पण करण्यात आले. फ्रेसीनियस मेडिकल केअर कंपनीचे दोन जागतिक दर्जाच्या डायलिसिस मशीन तसेच आर.ओ. वॉटर प्लांट, डायलायझर री प्रोसेसर मल्टी-पेरा मॉनिटर्स आदी. चा यामध्ये समावेश आहे. खूप वर्षापासून येथील गरजू व गरीब रुग्णांची मागणी होती की उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस ची सुविधा उपलब्ध व्हावी. आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नाने आज ती पूर्ण झाली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे, उपनगराध्यक्ष संजय चीतारे, नगरसेवक बबलू कांबळे, अरुणा डहाळे, डॉ. दीपक जाधव,राजू गजधने, हरेश खोमणे, जितू मगर,सचिन कुलथे, रामेश्वर मंत्री, गणेश पवार, इक्बाल शेख व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
आमदार राहुल कुल म्हणाले, येथील रुग्णांच्या खूप वर्षापासूनच्या मागणीचा विचार करून सन 2018 मध्ये सिद्धिविनायक ट्रस्टकडे मागणी करून, राज्य शासनाच्या माध्यमातून विविध ग्रामीण रुग्णालयांना डायलिसिस युनिट दिलेले होते. त्यापैकी दोन येथील रुग्णालयाला सुद्धा दिलेले होते. मागच्या दोन वर्षापासून कोरोना ची परिस्थिती पाहता त्याला आवश्यक असणारी इतर यंत्रणा निर्माण करणे शक्य झाले नव्हते. परंतु आता कोरोना तून बाहेर पडल्यानंतर या युनिटला आवश्यक असणारे फिल्टरेशन व इतर व्यवस्था करून आज डायलिसिस ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अतिशय गरीब असणाऱ्या रुग्णांना दौंड सारख्या ठिकाणी डायलिसिस ची निशुल्क सुविधा उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा असणाऱ्या रुग्णांना ही सुविधा अतिशय सोयीची असणार आहे.डॉ. संग्राम डांगे व त्यांचे सर्व सहकारी यांनी कोरोना काळामध्ये चांगले काम केले आहे त्याचप्रमाणे ते डायलिसिस ची व्यवस्थाही चांगली करतील अशी माझ्यासह सर्वांनाच खात्री आहे. त्याचप्रमाणे दौंड ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण होत आहे,32 कोटी रू.इमारतीची वर्क ऑर्डर झालेली आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून, जसे यवत येथील ट्रॉमा सेंटर ची इमारत उभी केली तशा प्रकारे पुढील वर्ष दीड वर्षात रुग्णालयाची मोठी इमारत उभी राहील आणि सर्व सुविधांसह या ठिकाणी रुग्णांवर उपचार होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शासनाकडून सहाय्य मिळेलच तसेच इतर उद्योजकांकडून सुद्धा काही मदत घेऊन रुग्णांना ज्यादा च्या सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुल कुल म्हणाले.