Categories: क्राईम

दौंडमध्ये दरोडेखोरांचा धुडगूस, पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासह 4 ठिकाणी दरोडा! पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करीत लाखाचा ऐवज लुटला

– अख्तर काझी

दौंड : दौंड -गोपाळवाडी रोड परिसरातील भवानीनगर, गजानन सोसायटी, शिवराज नगर भागामध्ये 5 ते 6 दरोडेखोरांनी रात्री दोन ते तीन वा. च्या दरम्यान जवळपास चार घरांवर दरोडा टाकल्याची घटना घडली असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे.

यापैकी भवानीनगर येथे राहणाऱ्या दौंड पोलीस कर्मचारी अण्णासो. देशमुख यांच्या घरावर दरोडेखोरांनी रात्री 3 वा. दरम्यान दरोडा टाकत बंगल्यात प्रवेश करून देशमुख यांना मारहाण केली व घरातील रोख रक्कम व दागिने असा 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलिसाच्याच घरावर दरोडा पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. त्या दिशेने पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली आहे. पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण करून दरोडा पडल्याची खबर मिळताच दौंडचे उपविभागीय पो. अधिकारी धस तसेच पो. निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व जखमी देशमुख यांची विचारपूस करून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले.

पुणे जिल्हा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळी येऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.
या घटने आधी याच दरोडेखोरांनी गजानन सोसायटी मधील विंचुरकर यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला. दुमजली असणाऱ्या या बंगल्यामध्ये दरोडेखोरांनी प्रवेश करून पहिल्यांदा तळमजल्यावरील खोल्यांना कडी लावली व वरच्या मजल्यावरील खोलीत ते घुसले, खोली मध्ये असणाऱ्या दोन महिलांना आपल्याकडील शस्त्राने धमकावीत त्यांनी तेथील कपाट फोडले परंतु त्यांना कपाटात काहीच ऐवज मिळाला नाही म्हणून त्यांनी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने(2 तोळे) हिसकावून घेतले व त्यांच्याकडील पर्समधील 6 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटून नेली.

यावेळी महिलांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करीत एकाला पकडले होते परंतु त्याच वेळेस खोलीतील लाईट गेल्याने त्यांनी महिलेला हिसका देत पळ काढला, अशी माहिती या महिलांनी दिली. या संपूर्ण परिसरातील 4 ते 5 घरांवर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु यापैकी तीन जागी ते असफल ठरले तर दोन घरातील ऐवज व रक्कम लुटून नेण्यात दरोडेखोर यशस्वी झाले आहेत. दौंड, गोपाळवाडी रोड परिसरात मोठी लोकवस्ती आहे.

या परिसरामध्ये याआधी ही दरोडेखोरांनी अनेक वेळा दरोडे टाकलेले आहेत. या परिसरात पोलीस चौकी असावी अशी मागणी अनेक वेळा झालेली आहे, परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाकडून या परिसरात पोलीस चौकी देण्यात आलेली नाही. अशा घटना घडल्या नंतरच परिसरातील पोलीस चौकीचा विषय चर्चिला जातो पुढे मात्र काहीच होताना दिसत नाही. आजच्या घटनेत तर पोलीस कर्मचाऱ्या लाच मारहाण करून दरोडा पडल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांकडून माहिती घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दौंड पोलिसांकडून सुरू आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

22 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago