Categories: राजकीय

Daund | उद्या भाजपकडून लाभार्थी, बूथ मेळावा

दौंड: भारतीय जनता पार्टी, लोकसभा प्रवास योजने अंतर्गत लाभार्थी व बूथ प्रमुख मेळावा आयोजित केला असल्याची माहिती भाजपचे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना ताकवणे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकांसाठी विकासात्मक आणि संघटनात्मक बांधणी मोहिमेचा भाग म्हणून भाजपने लोकसभा प्रवास योजना हा उपक्रम सुरु केला असून याचा भाग म्हणून सोमवार दि. ५ जून रोजी सकाळी दहा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंगजी पटेल, सह क्लष्टर प्रमुख, मोदी@९ संजयजी टंडन व दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल हे उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा श्रीकृष्ण मंगल कार्यालय, केडगाव चौफुला येथे पार पडणार असून लाभार्थी व बूथ प्रमुख यांच्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुखांनी आपल्या परीसरातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसमवेत उपस्थित रहावे असे आवाहन माऊली ताकवणे यांनी केले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago