दौंड: भारतीय जनता पार्टी, लोकसभा प्रवास योजने अंतर्गत लाभार्थी व बूथ प्रमुख मेळावा आयोजित केला असल्याची माहिती भाजपचे दौंड तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना ताकवणे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकांसाठी विकासात्मक आणि संघटनात्मक बांधणी मोहिमेचा भाग म्हणून भाजपने लोकसभा प्रवास योजना हा उपक्रम सुरु केला असून याचा भाग म्हणून सोमवार दि. ५ जून रोजी सकाळी दहा वाजता
हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंगजी पटेल, सह क्लष्टर प्रमुख, मोदी@९ संजयजी टंडन व दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल
हे उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा श्रीकृष्ण मंगल कार्यालय, केडगाव चौफुला येथे
पार पडणार असून लाभार्थी व बूथ प्रमुख
यांच्यासाठी हा मेळावा आयोजित
करण्यात आला आहे. यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुखांनी आपल्या परीसरातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसमवेत उपस्थित रहावे असे आवाहन माऊली ताकवणे यांनी केले आहे
.