दौंड | ‛बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या गोपाळवाडी शाखेत ग्राहकांची 1 कोटी 73 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक

दौंड : दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथे असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बँकेत काम करणाऱ्या एका इसमाने या बँकेतील ग्राहकांची तब्बल 1 कोटी 73 लाख 37 हजार 983 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत अमितचंदन मदन चौधरी (वय 44 वर्षे, व्यवसाय डेपुटी झोनल मॅनेजर, पुणे पूर्व, बँक ऑफ महाराष्ट्र, सध्या रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून परशुराम तुकाराम भागवत (रा.बेटवाडी ता. दौंड जि. पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोपाळवाडी च्या बँक महाराष्ट्र मध्ये कंत्राटी पद्धतीवर हाऊस किपिंग चे काम करणारा परशुराम तुकाराम भागवत याने 2018 पासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गोपाळवाडी येथे काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणकावर बसून त्यांचे युजर आयडी व पासवर्ड वापरून बँकेतील खातेधारक यांची आर्थिक फसवणूकीचे व्यवहार केले आहेत. परशुराम भागवत हा ग्राहकांच्या फिक्स डीपॉजीट बुकमधून को-या कागदावर खातेधारकांना फिक्स डीपॉजीट रक्कम खात्यात जमा झाली आहे असे भासवून त्यांना हाताने लिहलेल्या बनावट पावत्या देत होता.

तसेच खातेधारकांना बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची महा डबल स्किम आली असून त्यात पैसे गुंतवून डबल होतील असे खोटे सांगून लोकांना त्यात पैसे गुंतवण्यास लावत असे आणि या लोकांकडून कोरे चेक घेवून खोट्या इलेक्ट्रीक साहित्याचा वापर करून बँकेच्या नावाचा बनावट दस्ताऐवज व पावत्या तयार करून त्यांना त्या देत होता. हे सर्व झाल्यांनातर तो खातेधारकांची फिक्स डिपॉजीट रक्कम ही बँकेच्या व संबधीत खातेदाराच्या संमती शिवाय परस्पर तोडून (ब्रेक) करून स्वताच्या व कुंटूबातील व्यक्तींच्या नावावर जमा करून तसेच काही कर्ज खाते धारक यांचे कर्ज खात्यात पैसे जमा करण्याच्या बहान्याने ते पैसे स्वताकडे घेवून त्यांना ते पैसे त्यांचे खात्यात जमा केल्याचे बनावट उतारे/पावत्या व त्यावर बँकेचे शिक्के मारून बनावट सहया करून, बँकेच्या लौकीकास बाधा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता असे या फिर्यादीत म्हटले आहे.

परशुराम भागवत याने या सर्व कृतीतून आत्तापर्यंत बँक खातेदारांची सुमारे 1 कोटी 73 लाख 37 हजार 983 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादी यांना वरील प्रकाराची खात्री झाल्यानंतर त्यांनी घडल्या प्रकाराची तक्रार दौंड पोलीस स्टेशन येथे दिली असून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गोपाळवाडी (ता.दौंड जि. पुणे) येथे कॉन्ट्रेक्ट बेसवर हाउस किंपीग चे काम करणारा कर्मचारी परशुराम तुकाराम भागवत (रा.बेटवाडी ता. दौंड जि.पुणे) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago