Daund Bad News – बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम बापाला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील वडगाव बांडे येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली असून बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.19/02/2021 रोजी  सायं.6ः00 चे सूमारास वडगांवबांडे ता.दौंड जि.पुणे या गांवचे हददीत फीर्यादी  राहत असलेल्या खोलीत पिडीत मुलीचा वडीलाने मुलगी (वय 13 वर्षे 4 महिने) ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा मुलगीवर जबरदस्तीने शारीरीक संबध केले आहेत. 



याबाबत यवत पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रवृत्तीला फाशीची शिक्षासुद्धा कमी पडेल असे कृत्य हे नराधम करू लागले आहेत, त्यामुळे अशा नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे बनले आहे.

आरोपी विरूध्द त्याच्या पत्नीने फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कापरे करत आहेत.