Categories: Previos News

दौंड ‛भाजप’ ची कार्यकारिणी जाहीर, हे आहेत नवीन पदाधिकारी

पुणे ग्रामीण : दौंड तालुका भारतीय जनता पार्टीची मुख्य कार्यकारिणी, इतर मोर्चे व आघाड्यांची कार्यकारिणी नुकतीच दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांचे उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी जाहीर केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार दौंड तालुक्यातील मुख्य कार्यकारिणी, किसान मोर्चा, ओ. बी. सी. मोर्चा, युवा मोर्चा, वाहतूक आघाडी व विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. किसान मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पदी देऊळगाव राजे येथील अभिमन्यू गिरमकर, ओ. बी. सी. मोर्चा तालुकाध्यक्षपदी रोहिदास टिळेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी अॅड. बापूराव भागवत, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्षपदी सुनील दोरगे, तर विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी सुरज ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार राहुल यांनी तसेच पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष कांचन कुल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर उर्वरित आघाड्या लवकरच जाहीर करणार असल्याचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे माऊली ताकवणे यांनी सांगितले आहे.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, मोहन म्हेत्रे, नीलकंठ शितोळे, उमेश देवकर, शब्बीर सय्यद, बाळासाहेब लाटकर, मुरली भोसेकर, किसन शिंदे, दादासाहेब केसकर, संजय इनामके व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago