अब्बास शेख
दौंड : दौंड तालुका ॲड बार असोसिएशन तर्फे आषाढी एकादशी निमित्त दौंडमध्ये येणाऱ्या पालखी व भाविक भक्तांचे स्वागत करण्यात येउन फराळ वाटप करण्यात आले. यावेळी दौंड न्यायालयाचे सर्व न्यायाधीश साहेब व वकील वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
वारकरी आणि भाविक भक्तांसाठी दौंड बार ॲडव्होकेट असोसिएशन च्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो. सकाळपासूनच ॲड बार असोसिएशन च्या वकिलांनी येणाऱ्या भक्तांसाठी फराळ आणि पाण्याची जय्यत तयारी केली होती अशी माहिती दौंड बार असो.चे अध्यक्ष ॲड प्रशांत गिरमकर यांनी दिली.सांगितले.
यावेळी ॲड येडे, ॲड जाधव, ॲड बलदोटा, ॲड कुलकर्णी, ॲड गुरसाळ, ॲड कांबळे, ॲड कामत हे आवर्जून उपस्थित होते.