Categories: क्राईम

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली चिरडून 10 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, सेवा रस्ता नसल्याने नागरिक संतप्त

अख्तर काझी

दौंड : शहरातील गोड राऊंड चौकातून बोरावके नगर रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकी वरील दहा वर्षाच्या मुलीचा ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. मुलगी आपल्या काका बरोबर आईस्क्रीम घेऊन घरी जात असताना काळाने तिच्यावर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घाला घातला.

सदरच्या अपघातामुळे शहरातून होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोहमार्ग पोलीस कर्मचारी संजय बापूराव थोरात यांची मुलगी मृणाल संजय थोरात (वय 10,रा. वेताळ नगर दौंड) हिचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काका संतोष बापूराव थोरात (रा. वेताळ नगर, दौंड) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे भाऊ संजय थोरात हे वेताळ नगर येथे एकत्र राहतात.दि.1 जाने. 2024 रोजी रात्री 9 वा. च्या दरम्यान फिर्यादी आपली पुतणी मृणाल हिला दुचाकी वर घेऊन येथील अण्णाभाऊ साठे उद्यानासमोरील गोकुळ हॉटेल येथे आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होते. आईस्क्रीम घेऊन ते दोघे गोल राऊंड ते कुरकुंभ रस्त्याने घरी जात असताना गोल राऊंड जवळील पेट्रोल पंपा समोर पाठीमागून उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने त्यांना ओव्हरटेक केले. यावेळी ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्याने ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन नंबर ट्रॉलीचा फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धक्का लागला. त्यामुळे फिर्यादी व दुचाकी वरील त्यांची पुतणी खाली पडले, यावेळी ट्रॉलीचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोल राऊंड ते बोरावके नगर महामार्ग रस्त्याचे काम चालू असताना या मार्गावर सेवा रस्ता न केल्याने या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सदरचे काम चालू असताना व या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असणारी जमीन राज्य राखीव पोलीस दलाचीच असताना सुद्धा येथे सेवा रस्ता का केला गेला नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या रस्त्यावर वेळोवेळी अपघात होऊन लोकांचे जीव जात आहेत. एखाद्या अपघातामध्ये प्राणहानी झाली की त्या दिवसापर्यंत नागरिक संताप व्यक्त करतात मग पुन्हा तीच परिस्थिती. त्यामुळे या मार्गावर सेवा रस्ता करण्यात येऊन लोकांची होणारी प्राणहानी टाळावी अशी मागणी होत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago