दौंड | लग्नास नकार दिल्याने तरुणीची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या, तरुणावर गुन्हा दाखल

दौंड : दौंड शहरामध्ये एका तरुणीने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 5 वर्षे प्रेमप्रकरण सुरु असतानाही तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याची फिर्याद मयत तरुणीचा भाऊ कौशल मोरोपंत गायकवाड याने दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आरोपी निखिल साबळे या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कौशल यांची बहीण साक्षी मोरोपंत गायकवाड ही आनंद हाँस्पीटल दौंड येथे डी.एम.एल.टी विभागात काम करीत होती. फिर्यादी हे काल दिनांक 11 रोजी रात्री 9.30 वाचे सुमारास काम करुन घरी आले त्यावेऴी त्यांची बहीन साक्षी ही त्यांना थोडी टेंन्शन मध्ये दिसली त्यामुळे त्यांनी तिला विचारले की, काय झाले त्यावर तिने सांगितले की, माझे निखिल साबऴे (रा-मोरेवस्ती ता-दौंड जि-पुणे) याच्या सोबत गेले 5 वर्षापासुन प्रेमसंबंध आहेत. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. पण तो माझ्या सोबत लग्न करण्यास नकार देत आहे. त्यामुऴे मी त्याला वारंवार माझ्या सोबत लग्न कर असे म्हणत आहे परंतु तो लग्न करण्यास तयार नाही त्यामुळे माझी जगण्याची इच्छा राहीली नाही असे म्हणत होती.

त्यावेऴी फिर्यादी यांनी तिची समजुत काढली आणि ते रात्री सर्वजण जेवण करून झोपी गेले. त्यानंतर आज दिनांक 12 मार्च रोजी सकाऴी 06.00 वाचे सुमारास फिर्यादी हे झोपेत असताना त्यांना दरवाजा लावल्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी झोपेतुन उठुन पाहीले त्यावेऴी घराचा दरवाजा बाहेरुन बंद करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरामध्ये जावुन पाहीले असता त्यांची बहीन साक्षी ही घरामध्ये दिसली नाही. त्यावेऴी त्यांनी शेजारी राहणारे सोहेल शेख यांना फोन करुन घराचा दरवाजा बाहेरुन उघडण्यास सांगितला. त्याने दरवाजा उघडल्यानंतर फिर्यादी यांनी टेरेसवर जावुन पाहीले त्यावेळी त्यांना त्यांची बहीन साक्षी ही दिसली नाही. त्यावेऴी त्यांनी टेरेसवरुन खाली पाहीले असता साक्षी ही रक्त बंबाऴ अवस्थेत खाली पडलेली दिसली. साक्षी हिला सर्वांनी औषध उपचारकामी दौंड शहरातील आनंद हॉस्पिटल येथे घेवुन गेले मात्र डॉक्टरांनी औषध उपचारापुर्वी मयत झाल्याचे सांगितले.

त्यामुळे साक्षी गायकवाड हीस आरोपी निखिल साबऴे (रा-मोरेवस्ती ता-दौंड जि-पुणे) याने साक्षी हिच्यासोबत लग्न करण्यास नकार देवुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलिस करत आहेत.