Categories: Previos News

Daund – श्री रेणुका देवी दिनदर्शिकेचे पारगावमध्ये प्रकाशन



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) येथे श्री रेणुका देवी सहकारी दुध उत्पादक  संस्थेचा दिनदर्शिका 2021 कॅलेंडर प्रकाशन कार्यक्रम दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते पार पडला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार हे होते. यावेळी कात्रज दूध संस्थेचे माजी चेअरमन रामभाऊ टुले, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप हंडाळ, सागर फडके, संचालक शिवाजी वाघोले, शांताराम बांदल, विधानसभा अध्यक्ष तात्यासाहेब टेळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विठ्ठल दोरगे, पंचायत समिती सदस्य सयाजीराव ताकवणे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन माजी चेअरमन सुभाष  बोत्रे, संचालक संतोष ताकवणे हे उपस्थित होते.  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या संस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव ताकवणे यांनी केले. यावेळी रमेश थोरात यांनी बोलताना रेणुका दूध संस्थेच्या तीस वर्षाच्या कामगिरीबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगून पारदर्शक कारभार, चांगला दर सभासदांना बोनस, बक्षीस वाटप, सभासद व कामगार यांना मुलगी झाल्यास ५००० रुपये भेट या संस्थेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. 

तसेच पुढे बोलताना कोरोनामुळे सर्वच व्यवसायांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून सहकार क्षेत्रालाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. खाजगी पेक्षा सहकारी संस्था या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने  आर्थिक सहकार्य करत आहेत. देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्था शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करत आहेत. शेतकऱ्यांच्या जिवन उंचावत आहे असे सांगत रेणुका दूध संस्था शेतकऱ्यांना देत असलेल्या चांगल्या दराबद्दल संस्थेचे कौतुक केले. 

१ जानेवरी पासून कात्रज दूध संस्थेचे दरात प्रती लिटर १ रूपयांची वाढ होत आहे याचाही फायदा शेतकऱ्यांना होनार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भोगावडे सर यांनी केले तर आभार चांदभाई मण्यार यांनी मानले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago