Daund | खाटीक गल्लीतील 7 जण 1 वर्षासाठी तडीपार

दौंड : महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून त्यामधून टोळीची आर्थिक प्राप्ती करीत असलेल्या दौंड मधील सात जणांच्या टोळीला दौंड पोलिसांनी संपूर्ण पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातून (पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीसह) 1 वर्षाकरिता तडीपार केले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.

अश्फाक उर्फ लाला कासम कुरेशी, असिफ कासिम कुरेशी, वाजिद सादिक कुरेशी, कय्युम शब्बीर कुरेशी, बाब्या उर्फ इमरान इब्राहिम कुरेशी, इद्रिस अबिद कुरेशी ,तनवीर इस्माईल कुरेशी (सर्व राहणार खाटीक गल्ली, दौंड) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात वेळोवेळी कायदेशीर कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये काहीही फरक पडत नव्हता, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव तयार करून पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीणचे पो. अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पो. अधीक्षक आनंद भोईटे, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक भाऊसाहेब पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. निरीक्षक अविनाश शीळीमकर, पो.उपनिरीक्षक सतीश राऊत, पो. ना. शरद वारे ,पो. हवा.महेश बनकर ,पो. कॉ. सागर गलांडे व योगेश गोलांडे यांनी केली.