Daund – समाजाच्या जडण घडणीमध्ये वारकरी सांप्रदयाचे महत्वपूर्ण योगदान – हभप प्रकाश महाराज बोधले



दौंड : सहकारनामा

भौतिकतेची कास धरित वाटचाल करणाऱ्या समाजाला शाश्वत व चिरकाल सुख देणारी अध्यात्मिक विचारधारा समाजापर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य सकल संतांनी केले. हे कार्य करित असताना भेदभावाचे उच्चाटन करुन सर्वांना संघटीत केले व संस्कारक्षम समाज घडविला, हीच विचारधारा आपल्याला पुढे न्यायची आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळचे राष्ट्रीयअध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांनी केले .

अखिल भारतीय वारकरी मंडळाचा दौंड तालुका स्तरिय मेळावा बोरमल नाथ देवस्थान याठिकाणी पार पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हभप.दत्तात्रय सोळसकर महाराज, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नामदेवआप्पा चव्हाण, महाराष्ट्र राज्य संत वाड्मय प्रचार प्रसार प्रमुख आनंद महाराज तांबे, विभागीय उपाध्यक्ष दिपक म.खांदवे पुणे जिल्हाध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, राजेंद्र म.भाडळे, युवराजदादा शिंदे, जेष्ठ किर्तनकार बंकट महाराज ढवळे, दौंड तालुकाध्यक्ष शामसुंदर महाराज ढवळे, सुभाष गायकवाड, नाना महाराज दोरगे, सयाजीआण्णा ताकवणे, लालासो शितोळे, कैलासआबा शेलार, महादेव शितोळे, राजेंद्र पिलाणे,रामदासदादा नरुटे,शिवाजी गुंड,परसुरामदादा शिंदे, प्रकाशजी तरटे, गिरमेआण्णा, शाहाजीराव जाधव आदी वारकरी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रम सुत्रसंचालन कार्याध्यक्ष हभप.हरिष महाराज फडके यांनी केले तर आभार सचिव अभिजित महाराज जाचक यांनी मानले. यावेळी बोरमलनाथ देवस्थान प्रमुख व गोपालन समिती वारकरी मंडळ ता.प्रमुख कैलासआबा शेलार यांनीही या कार्यक्रम ला महत्वपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.