Categories: Previos News

Daund : गलांडवाडी येथील एकाला कोरोनाची बाधा, तर 61 जण निगेटिव्ह

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे एका 60 वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाली आहे, मात्र त्याच बरोबर 62 पैकी 61 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आता कुठेतरी आळा बसत असल्याचे दिसत आहे. 

यवत ग्रामीण रुग्णालय आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरतर्फे एकूण 62 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी गलांडवाडी येथील फक्त 1 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.

दौंड तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने चांगलाच जम बसवला असल्याचे विविध रिपार्टवरून समोर येत आहे मात्र तरीही आता मोठ्या प्रमाणावर रुग्ण निगेटिव्ह आढळू लागल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्यात प्रशाकीय यंत्रणेला यश येत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

12 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

14 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

15 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

23 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago