Daund – माधुरी काकडे यांच्या काव्यसंग्रहास उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार प्रदान



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

पर्यावरणावर आधारित माधुरी काकडे लिखित सृष्टी काव्य या काव्यसंग्रहास फलटण येथील ऍग्रो न्यूज परिवारातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार देण्यात आला. 

कोविड योद्ध्यांना समर्पित केलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलना( फलटण) मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते माधुरी काकडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

माधुरी काकडे- प्रमोद काकडे दाम्पत्यांनी पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुस्तक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे, महादेव गुंजवटे, प्रा. विजय काकडे, डॉ. प्रसाद जोशी, रवींद्र येवले, अरुण पुराणिक तसेच संमेलनाचे संयोजक प्रकाश सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.