Categories: Previos News

Daund – निवडणूक विशेष : 51 पैकी या 2 ग्रामपंचायती बिनविरोध, तर 2,131 पैकी इतक्या उमेदवारांनी घेतली माघार, रिंगणात उरले फक्त ‛एवढेच’ उमेदवार

दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड  तालुक्यातील 51 ग्रामपंचायतिसाठी निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात 51 ग्रामपंचायत मधील 565 जागांसाठी एकूण 2,272 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 

अर्ज छाननी प्रक्रियेनंतर 2094 उमेदवारांचे 2131 उमेदवारी अर्ज राहिले होते.

आज दिनांक 4 जानेवारी, रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 2,131 उमेदवारी अर्जांपैकी 741 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 1,012 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 

यात तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी  गलांडवाडी व हातवळण ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात तेथील ग्रामस्थांना यश आले आहे. त्यामुळे आता 49 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.

निवडणुकीमध्ये एकाच जागेसाठी गटातील दोन पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यामुळे या इच्छुक उमेदवारांपैकी नक्की कोणी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत हा निर्णय घेताना गटाच्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. अनेक जागी नेत्यांना अनेकांची मनधरणी करावी लागल्याचे चित्र आज पहायला मिळत होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago