Categories: Previos News

Daund – दौंड तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आ.कुल अधिकाऱ्यांची आढावा बैठक




– सहकारनामा

दौंड : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाय योजना तसेच तयारीचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची काल शासकीय विश्रामगृह यवत येथे आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी खालील मुद्यांवर चर्चा करण्यात आली –

१)  खाजगी दवाखान्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दर्शवणारा तक्ता दर्शनी भागात लावावा तसेच खाजगी इस्पितळांद्वारे आकारण्यात येणारे बिलावर नियंत्रण ठेवावे.

 

२) गृह विलगीकरणात असणारे कोरोना बाधित रुग्ण बाहेर फिरणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. 

३) रुग्णांना हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्याची गरज पडल्यास तालुक्यातील कोरोना रुग्णांना प्राधान्य देण्यात यावे.

 

४) दौंड शहर व तालुक्यातील व्यापारी बांधवांची कोरोना तपासणी करण्यासाठी मोबाईल व्हॅन युनिट सुरू करण्यात यावे. 

५) कोरोना लसीकरण नोंदणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल  विभागाचे कर्मचारी यांची मदत घेऊन कोरोना लसीकरणाची गती वाढवावी. 

अश्या विविध विषयांवर चर्चा झाली.

या प्रसंगी श्री. सचिन आखाडे (नायब तहसीलदार),  श्री. अजिंक्य येळे (गटविकास अधिकारी),  श्री. भाऊसाहेब पाटील ( पोलीस निरीक्षक यवत), श्री. पालवे (पोलीस उपनिरीक्षक, दौंड), डॉ. संग्राम डांगे (अधीक्षक दौंड उपजिल्हा रुग्णालय), डॉ. सुरेखा पोळ (तालुका वैद्यकीय अधिकारी), डॉ. शशिकांत इरवाडकर (अधीक्षक, यवत ग्रामीण रुग्णालय) आदी तसेच श्री. नामदेव नाना बारवकर (उपाध्यक्ष, भीमा पाटस), श्री. माऊली ताकवणे (तालुकाअध्यक्ष, भाजपा), श्री. गणेश आखाडे (जिल्हा ग्रामविकास आघाडी, सदस्य भाजप), श्री. हरीभाऊ ठोंबरे आदी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago