Daund : पारगावमध्ये 2 तर तांबेवाडीमध्ये एकाला कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

कोरोनाच्या प्रदूर्भावणे तालुक्यातील विविध गावांमध्ये शिरकाव करत नागरिकांना जेरीस आणले आहे.

कोरोनाचे संकट दूर होईल असे वाटत असतानाच त्याचा परिणाम जास्तच वाढू लागला आहे. दि.30 सप्टेंबर रोजी दिल्या गेलेल्या स्वॅब टेस्टचे  आलेल्या अहवालातून पारगाव 2 तर तांबेवाडी येथील 1 असे एकूण 3 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

याबाबतची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 64 जणांचे स्वॅब घेण्यात आले  होते त्यामध्ये 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

पॉझिटिव्ह अलेल्यांमध्ये  2 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. तिन्ही रुग्णांचे वय हे 60 ते 68 दरम्यान आहे.