Daund : राज्य सभेत घडलेल्या घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडत असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्या नंतर जय हिन्द, जय महाराष्ट्र, जय भवानी अशी घोषणा दिली तेव्हा राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे यांना समज दिली या  घटनेचा दौंड शिवसेनेने निषेध नोंदविला. 

यावेळी पक्षाच्यावतीने तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. अखंड हिंदुस्तानचे दैवत राजे छत्रपती शिवाजी  महाराज यांच्या नावाचा उल्लेख करू नये असे सभापती ती नायडू यांनी खासदारांना सुनावले आहे असा आरोप शिवसेनेने करत, यामुळे अखंड भारतातील जनतेचा अवमान झाला असल्याचे म्हटले आहे. 

या घटनेचा शिवसेनेच्या वतीने निषेध  करण्यात येत आहे असे निवेदनात नमूद केले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख आनंद पळसे, प्रसाद कदम,  अजय कटारे, दीपक चितारे, नितीन सलामपुरे, अजित फुटाणे आदी उपस्थित होते.