Categories: Previos News

Daund : सिद्धी काळेचे राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत यश



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (प्रशांत वाबळे)

‘एक मित्र एक वृक्ष ग्रुप पुणे’आयोजित कोरोना लॉकडाउनच्या काळात पर्यावरण संवर्धनाची जाणीव व्हावी या उद्देशाने चित्रकला, रांगोळी, निबंध, ऑनलाइन वकृत्व या सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

‘पर्यावरण रक्षण काळाची गरज’ हा विषय या स्पर्धेसाठी देण्यात आला होता. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन स्पर्धकांचे व्हिडिओ ऑनलाइन पद्धतीने मागवन्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला, यामधे शिरापुर (ता. दौंड) येथील सिद्धी सनदकुमार काळे या विद्यार्थिनीने राज्यात दूसरा क्रमांक पटकावला आहे. सिध्दी शिरापुर येथील जि. प. प्राथमिक शाळेत सातवीत शिकत आहे. प्रथम क्रमांक कुशलकुमार नीतिनकुमार माळी(नवापुर) तर तृतीय क्रमांक प्रियदर्शनी महेश भोंग (श्रीरामपुर)यांनी पटकावला आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी पाचशे रूपये आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठवन्यात आले असल्याची माहिती या ग्रूपचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी दिली. परीक्षक म्हणून महादेव पंडित, शुभाष फ़ासगे, युवराज घोगरे यांनी काम पाहिले. शेतकरी कुटुंबातील सिद्धिने हे यश संपादित केल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जि. प. शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने तिचे विशेष अभिनंदन केले. सिद्धीचे चुलते शेतकरी संघटनेचे तालुका पदाधिकारी असून वडील खाजगी बँकेत सेवा करित आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago