दौंड : सहकारनामा ऑनलाइन
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी त्यांचे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात येत आहेत.
दौंड तालुक्यातील केडगाव-दापोडी रोडवरही असेच जनसंपर्क कार्यालयाचे काल आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे कार्यालय महालक्ष्मी एंटरप्राइजेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर आबासाहेब चोरमले व सृष्टी गूळ उदयोग समूह, धनश्री कॉम्प्लेक्स केडगावचे दिलीपभाऊ जराड यांच्या प्रयत्नातून उघडण्यात आले आहे.
दौंड तालुक्यामध्ये सध्या लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे तशा नागरिकांच्या अडचणीही वाढत आहेत. त्यामुळे विविध भागांतील या सर्व नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी तालुक्यात माध्यवर्तीभागामध्ये आमदार कुल यांच्या कार्यकर्त्यांकडून जनसंपर्क कार्यालये उघडण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित भागातील व्यक्तींच्या अडीअडचणी या त्याच भागात सोडविल्या जाणार असून त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.