Darshana Pawar Murder Case | माझी नाही तर कुणाचीच नाही ‛या’ नीच मानसिकतेतून दर्शनाची हत्या… मुलींनो वेळीच सावध व्हा, जीवघेण्या फ्रेंडशिप पासून स्वतःला वाचवा

अब्बास शेख

पुणे : एमपीएससी (MPSC) टॉपर दर्शना पवार (Darshana Pawar) खुन (Murder) प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी (Pune Rural Police) उलगडा केला आणि यातून धक्कादायक अशी माहिती समोर आली. केवळ लग्नास नकार दिला म्हणून ‛माझी नाही’ तर कुणाचीच नाही’ या ‛नीच’ मानसिकतेतून दर्शना पवार हिची हत्या तिच्याच जवळच्या मित्राने केल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. त्यामुळे मैत्री, फ्रेंडशिप (Friendship) करताना ती सावध राहून केलेली बरी अन्यथा आंधळा विश्वास तुम्हाला थेट या जगातून उठवू शकतो हे या आजच्या घटनेने अधोरेखित झाले आहे.

दि. १८/६/२०२३ रोजी वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत असणाऱ्या सतीचा माळ येथे एक बेवारस तरुणीचा मृतदेह आढळुन आला होता. या मृतदेहाजवळ ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, काळ्या रंगाचा गॉगल तसेचकाळया रंगाची बॅग व इतर वस्तु मिळून आल्या होत्या. त्यावरून मृतदेहाची ओळख पटवून तो मृतदेह दर्शना दत्तू पवार (वय २६ ) हिचा असल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ माजली. कारण एम.पी.एस.सी परीक्षेत टॉप आलेल्या विद्यार्थ्यांपैकी दर्शना एक होती. या परिस्थेत उत्तीर्ण झाल्यानंतर ती वन अधिकारी पदावर कार्यरत होणार होती. अधिकारी होऊन कामावर रुजू होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या दर्शनाच्या नशिबी मात्र वेगळेच काहीतरी होते.

दर्शना पवार ही दिनांक १२/०६/२०२३ रोजी १० वाजता सिंहगड किल्ला फिरण्यास जाते असे सांगून गेली होती ती परत आलीच नाही. तिचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे १५/०६/२०२३ ती मिसींग झाल्याची खबर दिली. त्यातच दर्शनाचा मृतदेह गडाच्या पायथ्याला आढळून आल्याने गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व वेल्हे पोलीसांची विशेष पथके तयार केली.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकास परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांकडून मिळालेल्या माहितीवरून दर्शनाचा मित्र सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय 28 वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो.शहा, ता. सिन्नर, जि. नाशीक) हा गुन्ह्यातील मुख्य संशयीत असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे पिलीसांना समजले. त्यावरून तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून त्याला ताब्यात घेतले. यानंतर आरोपी राहुल हंडोरे याने दर्शनाचा खून केल्याचे कबुल केले.

दर्शना एमपीएससी (MPSC) ची तयार करत असताना राहुल हाही एमपीएससी (MPSC) ची तयारी करत होता. दोघांमध्ये मैत्री म्हणजेच तरुणाईच्या भाषेत फ्रेंडशिप होती. मात्र याच फ्रेंडशीप ने नंतर दर्शनाचा घात केला आणि तिचे अधिकारी होऊन कामावर रुजू होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

17 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago