Categories: राजकीय

ओघाने ‘विधानसभेत’ निवडून गेले मात्र तेथे काहीच नाही केले, प्रत्येक क्षेत्रात अज्ञानी : आमदार ‘राहुल कूल’ यांची टिका| ‘सहकारी संस्था’ बंद पाडून दुसऱ्यांना नाही दिल्या, एकतरी ठळक काम दाखवा, आम्ही 5 वर्षात ‘ही’ कामे केली : माजी आमदार ‘रमेश थोरात’ यांचे प्रत्युत्तर


राजकीय / Political

आमदार राहुल कूल यांच्याहस्ते परवा नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी त्यांनी माजी आमदार रमेश थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडून टिका केली. ही टीका एका वृत्तपत्रामध्ये छापून आल्यानंतर माजी आमदार रमेश थोरात यांनी आमदार राहुल कूल यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार राहुल कूल यांनी नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभावेळी माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर टिका करताना, यांना 2009 साली ओघाने विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली मात्र त्यांना तेथे काहीच प्रश्न उपस्थित करता आले नाहीत, त्यांचे प्रत्येक क्षेत्रात अज्ञान असून त्यांना मोबाईलही नीट हाताळता येत नसल्याने ते कधी-कधी मलाच फोन लावतात अशी मिश्किल टिका केली होती. मी कोरोना काळात प्रत्येकाला मदत केली मात्र, कोरोना काळात विरोधपक्षाचे खासदार, किंवा त्यांच्या ताब्यात असणाऱ्या झेड.पी, बाजार समिती, खरेदि विक्री संघ व यांसारख्या इतर संस्थानी मात्र कुठलीच मदत केली नाही असा आरोप त्यांनी केला होता. आमदार राहुल कूल यांनी केलेल्या या टिकेनंतर माजी आमदार रमेश थोरात यांनीही पलटवार केला आहे.

माजी रमेश थोरात यांनी प्रत्युत्तर देताना, ज्यांना एकही सहकारी संस्था टिकवता आली नाही. स्वतःच्या गावची सहकारी सोसायटी सांभाळता आली नाही ते आमच्यावर टिका करतात हे हास्यास्पद असल्याचे म्हटले असून ज्यांच्या घरात 25 वर्षे आमदारकी आहे त्या आमदार राहूल कूल यांनी त्यांचे एखादे ठळक काम सांगावे असे आवाहन दिले. आणि मी मात्र ‘पाच’च वर्षे आमदार होतो परंतु या काळामध्ये जी कामे केली त्याचा लेखाजोखा सांगितला.

• दौंड शहरात 4 एकर जागा आणि तेथे सेंट्रल बिल्डिंग केली. त्यात तहसील ऑफिस विविध ऑफिसेस झाली.
• दौंडकरांची अनेक वर्षे कुरकुंभ मोरीची मागणी होती. माझ्या 5 वर्षाच्या आमदारकीच्या काळात अजितदादांनी या कुरकुंभ मोरीसाठी 21 कोटी चा निधी दिला. शरद पवार साहेबांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले. रेल्वे खात्याकडून कामही सुरु झाले मात्र नगरपालिकेत जमा करण्यात आलेले पैसे नगरपालिकेने रेल्वे खात्याकडे जमा न केल्याने रेल्वेने ते काम थांबवले. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी तेथे धरणे आंदोलन केले आणि त्यानंतर काही महिन्यांनी ते पैसे वर्ग करण्यात आले आणि मग त्याचे काम सुरु झाले आणि आता कुरकुंभ मोरी सुरु झाली आहे.
• मी आमदार असतानाच दौंड शहराला अंडर ग्राउंड ड्रेनेज केले. अजितदादांनी मला यासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून दिला.
• दौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी आर.आर.पाटील साहेबांकडून गृह खात्याची 2 गुंठे जागा उपलब्ध केली आणि 25 रुपये लाख रुपये खर्च करून तो आश्वारूढ पुतळा उभारला.
• वडगाव दरेकर, नानगाव, वाळकी या 3 ठिकाणी 14-14 कोटींचे नदीवरील पूल करून घेतले.
• दौंड शहरात व ग्रामीण भागात अंडरग्राउंड केबल,रस्ते करून घेतले.
• 2500 ॲडिशनल ट्रान्सफार्मर आणि 4 सबस्टेशन केली. ही माझी 5 वर्षात दिसणारी कामे आहेत. मात्र 25 वर्षे आमदारकी तुमच्या घरात आहे. तुम्ही तुमचे दिसणारे एखादे ठळक काम दाखवा असे आवाहन माजी आमदार रमेश थोरात यांनी केले.

पुढे बोलताना त्यांनी, 4 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस मोळी टाकायला आले त्यानंतर कारखाना चालू ठेवण्यासाठी 36 कोटी देऊन गेले तरी यांनी कारखाना बंद केला आणि नंतर प्रायव्हेट करून कर्नाटकवाल्यांना चालवायला दिला असा आरोप करत आम्ही सहकारी तत्वावर असणारी जिल्हा बँक गेली 42 वर्षांपासून चालवत आहे. आज ती बँक देशात आणि आशिया खंडात टॉप ला आहे. मागील वर्षी बँकेचा 350 कोटी नफा झाला आहे. तरी यातले 179 कोटी रुपये भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने थकवले आहेत. मात्र तरीही बँकेचा NPA हा झिरो आहे. अशी आमची कामे असून यांच्या राहू गावची विकास सोसायटी बंद असून त्यात 9 कोटींचा तोटा आहे आणि हे कागदावर असून आम्ही मनाचे सांगत नाही. इतकेच नाही तर तेथील पाणी पुरवठा योजना बंद आहे, आमची खुटबावची योजना ही योजना यात कसा फरक आहे हे जनतेला माहित आहे. राहू आणि परिसर इतका मोठा असून तेथे असणाऱ्या कॉलेजमध्ये केवळ 1400 विध्यार्थी आहेत तर खुटबाव हे छोटेसे गाव असूनही या ठिकाणी 3200 विध्यार्थी आहेत. यातील 350 विध्यार्थी हे राहू परिसरातून या ठिकाणी शिकायला येतात हा संस्था चालवण्यामधला फरक आहे असे शेवटी माजी आमदार रमेश थोरात यांनी म्हटले.

कूल-थोरात यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे दौंड तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा तप्त झाले असून येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप × विरुद्ध राष्ट्रवादी अशी मोठी राजकीय लढाई जनतेला पहायला मिळणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago