Categories: Previos News

Crime – डाळिंब येथे वाळू माफियांवर कारवाई, वाळू उपसा करणारे पोकलेन मशीन जप्त



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील डाळिंब येथे यवत पोलिसांनी छापा टाकून तेथे सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा बंद केला आहे. यावेळी तेथे वाळू उपसा करणारे एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार डाळिंब गावचे हद्दीत काही इसम बेकायदेशीर अवैधरित्या वाळू उपसा करीत असलेबाबतची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे त्यांनी तेथे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कुंजीर यांना रवाना केले होते. 

त्यावेळी सदर ठिकानावरून पो कॉ कुंजीर यांना वाळू उपसा करणारे एक लाल रंगाचे टाटा कंपनीचे पोकलेन मशीन दिसून आले ते त्यांनी ताब्यात घेत पुढील दांडात्मक व कायदेशीर कारवाई करिता दौंड तहसीलदार यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

सदर जप्त केलेले मशीन SRPF ग्रुप दौंड येथे लावणेत आले आहे.

दौंडचे तहसीलदार यांचे मार्फत सदर ठिकाणी झालेल्या वाळू उपश्याबाबत पंचनामा करण्यात आला असून 20 ब्रास माती मिश्रीत वाळू जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पो कॉ हेमंत कुंजीर, पो.कॉ.सुजित जगताप, पो कॉ विजय आवाळे, तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी कोकरे ,गावकामगर तलाठी प्रकाश कांबळे, कैलास बाठे, उद्धव गोसावी, किशोर परदेशी, मनोज तेलंग यांच्या पथकाने केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

15 मि. ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

16 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

1 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago