दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील नानगाव येथे पत्नीच्या असलेल्या अनैतिक संबंध आणि मानसिक, शारीरिक त्रासामुळे एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी आता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिपक महादेव खळदकर (वय ३८ वर्षे. रा. नानगाव अमोनी माळ टाकेमळा.ता. दौंड.जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी मयताची आरोपी पत्नी व सुनिल शिवाजी जगताप यांच्यावर आत्महत्येस कारणीभूत केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील मयताची आरोपी पत्नी व आरोपी सुनील जगताप यांच्यात असलेल्या लफडयाच्या (अनैतिक संबध) कारणावरून त्याचा मानसीक व शाररीक छळ होवुन त्यास कुठल्याही गोळया खावुन त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
हि बाब मयताने मरणापुर्वी दोन्ही आरोपींच्या नावाची चिठठी सापडल्यानंतर उघडकीस आली. त्यामुळे फिर्यादी यांनी ती चिट्ठी यवत पोलीस ठाण्यात आणुन देत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.