Categories: Previos News

Crime – मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, रोख रकमेसह आरोपी जेरबंद

पुणे : सहकारनामा

अवैधरित्या मटका जुगार चालू असलेल्या ठिकाणावर लोणीकाळभोर पोलिसांनी अचानक धाड टाकून मटका जुगार चालविणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

दिगंबर अरुण झेंडे असे या मटका चालकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलीस नाईक अभिमान कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे.

दि.22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या खोकलाई येथे पत्र्याच्या शेडमध्ये हा मटका जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती लोणीकाळभोर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी या ठिकाणी धाड टाकली.

यावेळी वर नमूद आरोपी आपले कब्जात बेकायदा, बिगरपरवाना कल्याण मटका जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम असा एकुन 2305/- रुपयांचा माल जवळ

बाळगले स्थितीत तसेच जुगाराचा धंदा

चालवित असताना मिळुन आला.

पोलिसांनी या इसमास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला असुन लोणीकाळभोरचे पोलीस निरीक्षक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

दिवसातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, मुद्देसूद माहिती आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या www.sahkarnama.in या वेबसाईटला भेट द्या.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago