दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील मिरवडी या गावामध्ये निवडणुकीच्या निकालावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार देण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.१९/१/२०२१ रोजी सायं ०७:४५ फिर्यादी आकाश तुकाराम शेंडगे (रा.मिरवडी ता.दौंड) हे त्यांचे चुलते पांडुरंग एकनाथ शेंडगे यांचे रायबा किराणा दुकानाच्या समोर उभे असताना यातील आरोपी गुलाब शंकर टकले, ऋषिकेश अतुल टकले, शांताराम पांडुरंग थोरात यांनी त्यांचा पॅनल विजयी झालेने डी.जे चालु करून भंडारा उधळत मिरवणुकीसह जात असताना ते फिर्यादी यांचे चुलते पांडुरंग एकनाथ शेंडगे यांचे रायबा किराणा दुकानाचे समोर आले तेव्हा आरोपींनी फिर्यादींना पाहून तुमच्या आईचा नवरा आला, वाघ निवडुन आला रे असे म्हणुन शिवीगाळ करू लागले.
त्यामुळे फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ करू नकोस असे समजावून सांगत असताना आरोपींनी तेथे पडलेला दगड हातात घेवुन फिर्यादी यांचे डोक्यात फेकुन मारल्याने फियादी यांचे डोक्यास दुखापत झाली. तर इतर आरोपींनी हाताने व लाथाबुक्कयाने मारहान करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर गुलाब शंकर टकले (रा.मिरवडी ता.दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि १९/१/२०२१ रोजी सायं ०७:३० वाचे.सूमा. फिर्यादी हे त्यांच्या गाडीतुन मिरवडी येथुन मेमाणवाडी रोडने टकलेवस्ती येथे जाण्यासाठी निघाले असताना मिरवडी ता.दौंड जि.पुणे येथील चंद्रकांत शिवहरी थोरात यांचे घराचे पाठीमागे लोक जमलेले बघुन काय
प्रकार आहे हे पाहण्यासठी गाडीतुन खली उतरले तेव्हा तेथे विजयी मिरवणुक झाली
होती.
यावेळी फिर्यादी यांच्याजवळ आरोपी पांडुरंग एकनाथ शेंडगे (रा.मिरवडी. ता. दौंड) हे येऊन आमचे उमेदवार पडलेने लय खुश आहे तु, अंगावर भंडारा घेवुन घरी निघाला काय असे म्हणुन फिर्यादीस
शिवीगाळ दमदाटी हाताने लाथबुक्कयाने मारहाण करून दुखापत केली व तसेच वॅगनर गाडीची काच फोडुन नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे असल्याची फिर्यादी दिली आहे.
यवत पोलिसांनी दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.