दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
शहरातील एका डॉक्टरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. डॉ. संजय देविदास जयकर (वय 48,रा. सावरकर नग, दौंड) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व पीडितेच्या नातलगांनी लग्ना बाबतीत विचारले असता त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने दौंड पोलिसांनी डॉक्टर संजय जयकर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला व दिनांक 19 नोव्हेंबर रोजी डॉ. संजय जयकर याला दौंड पोलिसांनी अटक केली.
दि.20 रोजी त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे दौंड पोलिसांनी सांगितले.
घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉक्टर संजय जयकर याने पीडित महिलेवर दिनांक 24/11/2018 व 25/11/2018 रोजी भिगवण गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत एका कंपनीच्या आवारा समोर आपल्या कार (चार चाकी) मध्ये तसेच दिनांक 30/11/2018 व 1/12/2018 रोजी कुरकुंभ- बारामती रस्त्यालगत तसेच 15/1/2019 व 2/2/2019 रोजी शहरातील जयकर हॉस्पिटल या इमारतीमधील फ्लॅटमध्ये पीडितेवर अत्याचार केला आहे.
पीडितेच्या फिर्यादीवरून डॉक्टर संजय जयकर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरात करीत आहेत.