Crime – लोणीकाळभोर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ



लोणी काळभोर : सहकारनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे)

लोणी काळभोर (ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तरवडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका घरातून सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी (१९ ) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

याप्रकरणी संतोष बाळासाहेब काळभोर (वय-३५ रा. तारासिटीजवळ, लोणी काळभोर,) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, संतोष काळभोर हे शेती करतात. शुक्रवारी संध्याकाळी घरातील सर्वजण झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागील दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला.

कपाटात ठेवलेले दीड – दीड तोळ्याचे दोन मंगळसूत्र व चार ग्राम कानातील कर्णफुल असा एकूण सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.