Crime – ‛तो’ अपघात नसून ‛खूनच’! मॉर्निंगवॉक ला जाणाऱ्या महिलेच्या अपघाती मृत्यूचे खरे कारण आले समोर, खुनात दौंडमधील युवकाचा ‛हात’



– सहकारनामा

पुणे : 

नीरा-लोणंद मार्गावर जवळ सकाळी मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलांना एका कार ने जोराची धडक दिल्याने यातील एक महिला जागीच ठार झाली होती तर अन्य एक महिला हि जबर जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये वैशाली संजय काशीद (वय ४२) यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर

सुनीता मोराळे (वय ३६) या जबर जखमी झाल्या होत्या. 

हा अपघात नसून खूनच असल्याची शंका पोलिसांना आली होती. कारण अपघात झाल्यानंतर कार बंद पडून चालक गाडी सोडून पळून गेला होता. पोलिसांनी हि गाडी ताब्यात घेत पंचनामा केला होता. या गाडीवरून पोलिसांनी गाडी चालक संकेत राजू होले (वय२३ रा. गोपाळवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यास ताब्यात घेत तपास सुरू केला. 

त्यावेळी सदरचा अपघात नसून प्रीप्लॅन खून असल्याचे व तो खून अपघात असल्याचा प्रयत्न  जाणूनबुजून केला असल्याचे आरोपीने सांगितले. संकेत होले यास यातील एका महिलेच खून करण्याबाबत रणजीत सुशांत जेधे (रा. निरा) याने सांगितले असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगीतले. यावेळी पोलिसांनी  रणजीत जेधे व संकेत होले याच्या मोबाईलचे टेक्निकल डिटेल्स चेक केले असता त्यामध्ये किरण सुमंत जेधे याचा सुद्धा कटात सहभाग असल्याचे दिसून आले. 

याबाबत यातील जखमी महिला सुनिता 

मोराळे यांच्या नातेवाईकांनी तक्रार करत सुनिता मोराळे व किरण जेधे यांचे दीड ते दोन वर्षापासून विवाहबाह्य संबंध असल्याचे व त्यातून दोघांचे वाद होत असल्याने सुनीता मोराळे यांना मारण्याचा कट किरण जेधे याने या दोघा आरोपींसोबत केल्याची तक्रार दिली होती.

टेक्निकल पुरावा आणि साक्षीदारांच्या

जबानीवरून किरण जेधे याला सुद्धा या गुन्ह्यात अटक करण्यात आली तर रणजीत जेधे याला शोधण्यासाठी लातूर सोलापूर या

ठिकाणी टीम पाठविण्यात आली होती

परंतु तो त्या ठिकाणावरुन पसार

झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर संकेत होले व किरण जेधे या दोघांना तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अपघाताचा बनाव करून हा खून करण्याचा सुनियोजित कट करण्यात आला होता मात्र पोलिसांनी तो मोठ्या शिताफीने उघड केला आहे. 

हि कामगिरी पोलीस निरीक्षक सुनील

महाडिक, पोलीस उपनिरीक्षक

सोनवलकर, गोतपगार, पोलीस

हवालदार मोकाशी, कुतवळ, पोलीस

नाईक कदम, पोलीस नाईक अक्षय

यादव, पोलीस शिपाई शेंडे, महाडिक यांसह नीरा पोलीस चौकीचे सुदर्शन होळकर, सुरेश गायकवाड, राजेंद्र भापकर, निलेश जाधव, हरिश्चंद्र करे, यांनी केली आहे.