Categories: Previos News

Crime News – दौंड : हातवळण येथे किरकोळ वादातून ‛कोयता, गज, दगड, विटा’ ने दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी.



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील हातवळण येथे पुनर्वसन जागेत पत्राशेड बांधण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून दोन्ही बाजूच्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर दत्तात्रेय भोसले( व्यवसाय शेती राहणार हातवळण जगताप मळा तालुका दौंड जिल्हा पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार 

आरोपी १) दीपक शिवाजी जगताप

२) सरिता दीपक जगताप 

३) शंकर शिवाजी जगताप 

४) अश्विनी शंकर जगताप 

५) राज शंकर जगताप 

(सर्व राहणार हातवळण जगताप मळा तालुका दौंड जिल्हा पुणे)

यांनी ता. २९ जुलै रोजी सकाळी ८:४५ वा. दरम्यान हातवळण गावचे हद्दीत असणाऱ्या पुनर्वसनाचे मोकळे जागेत यातील फिर्यादी यांचा चुलत भाऊ सोमनाथ भोसले हा फिर्यादी यांच्या घरासमोर पुनर्वसनचे मोकळे जागेत पत्राचे शेड बांधत असताना तेथे वरील आरोपीसह दीपक जगताप हातात लोखंडी कोयता घेऊन आला व दीपक जगताप हा सोमनाथ भोसले यास शिवीगाळ करत तुला सांगितलेलं कळत नाही का, तू येथे पत्राचे शेड बांधायचे नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने सोमनाथ भोसले यांचे कपाळावर मारहाण करून जबर दुखापत केली. त्यावेळी फिर्यादी यांची आजी हिराबाई आई शकुंतला व चुलत भाऊ सोमनाथ यास भांडणे सोडवण्यासाठी गेले असता दीपक जगताप याने लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांची आज्जी हिराबाई हिचे उजव्या हाताचे पोटरीवर वार करुन दुखापत केली आहे तसेच शंकर जगताप याने फिर्यादीची आई शकुंतला दत्तात्रय भोसले हिचे डाव्या हाताच्या बोटावर मारहाण केली तर फिर्यादी यांना यश शंकर जगताप याने हाताने मारहाण केली. तर चुलते बाळासाहेब भोसले यांना शंकर शिवाजी जगताप अश्विनी शंकर जगताप सरिता दीपक जगताप यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे यावरून वरील आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

पो.हवा.पानसरे ब.न.१५१३ हे करीत आहेत.

तर दुसऱ्या फिर्यादीत सौ.सोनाली दीपक जगताप (वय ३४ वर्ष व्यवसाय गृहिणी  राहणार हातवळण जगताप मळा तालुका दौंड जिल्हा पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी 

१)हरिभाऊ रंगनाथ भोसले 

२)बाळासो हरिभाऊ भोसले ३)सोमनाथ बाळासो भोसले ४)समीर दत्तात्रय भोसले ५)शकुंतला दत्तात्रय भोसले ६)यमुना बाळासाहेब भोसले (सर्व राहणार हातवळण तालुका दौंड जिल्हा पुणे) यांनी ता. २९ जुलै रोजी सकाळी ८:३०वा .दरम्यान हातवळण गावचे हद्दीत ता दौंड पुनर्वसनाचे मोकळे जागेत पुनर्वसनाचे हद्दीत इसम हरिभाऊ भोसले,

सोमनाथ भोसले ,समीर भोसले , असे पत्र्याचे शेड बांधत होते म्हणून फिर्यादी यांचे पती दीपक हे यांच्याकडे गेले व त्यांना म्हणाले की येथे बांधा लागत शेड बांधू नका. यापूर्वीही तुम्हाला सरपंच व गावातील इतर लोकांनी सांगितले आहे. तेथे दोन्ही गावाची शिव आहे. असे फिर्यादीचे पती त्यांना सांगत असताना वरील लोकांनी त्यांना शिवीगाळ , दमदाटी करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले.

फिर्यादी यांचे दीर शंकर जगताप व त्यांचा मुलगा यश जगताप व फिर्यादी यांची सासु यमुना व जाऊ अश्विनी असे सर्वजण भांडणे सोडण्यासाठी गेले असता त्यावेळी तेथे शकुंतला, हिराबाई, यमुना आले व वरील सर्वांनी फिर्यादी व उपस्थितांना वेगळे करून पडलेल्या विटा हातात घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी सोमनाथ भोसले यांनी मी आत्ता तुम्हा दोघा भावांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन सर्वजण निघून गेले. फिर्यादीच्या पतींच्या उजव्या हाताचे बोटाला दुखापत झाली असून कपाळावर विटाचा मुका मार लागला आहे. 

तसेच त्यांचे पती यांना डोक्यात व पुतण्या यश यांना डावे कानाजवळ पाठीत मार लागला आहे. अशी फिर्याद त्यांनी दिली आहे. त्यावरून  पो.हवा. पानसरे. यांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. अधिक 

तपास यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.मदने हे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

5 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago