पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक २७/०९/२०२० रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह शिरूर हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाचे महेंद्र कोरवी व किरण कुसाळकर यांना बातमीदारा द्वारे माहिती मिळाली होती.
या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने किरण सोनवणे, सुनील सोनवणे, संतोष मंडले सर्व राहणार- राळेगण थेरपा तालुका- पारनेर जिल्हा- अहमदनगर व हर्षराज शिंदे राहणार- बाभुळसर तालुका-शिरूर जिल्हा-पुणे यांना शिरूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
सर्व आरोपी वर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील आरोपींवर यापूर्वी खून ,दरोडा खुनाचा प्रयत्न यासारखे इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड श्री गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष चे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे शिरूर पोलिस स्टेशन, सहाय्यक फौजदार विश्वास खरात, पोलीस नाईक विशाल भोरडे ,किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसिन शेख, अरुण पवार या पुणे ग्रामीण च्या दहशतवाद विरोधी कक्ष व शिरूर पोलीस स्टेशन स्टाफ च्या पथकाने केली.