लोणीकाळभोर पोलीसांकडून सराईताला अटक, 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोणीकाळभोर : दि.१७/०८/२०२१ रोजी उमेश प्रल्हाद काळभोर (रा.अंबरनाथ मंदीराचे जवळ, लोणीकाळभोर ता. हवेली जि.पुणे) हे त्यांचे श्रीमंत अंबरनाथ नावाचे दुकान उघडे ठेवुन गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने दुकानातील ड्रावर मध्ये ठेवलेले १४,७००/-रू रोख रक्कम चोरी करून नेली होती. त्याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.४३८/२०२१ भा.द.वि.क. ३८० प्रमाणे दाखल आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तपास पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना दि.१०/११/२०२१ रोजी तपास पथकातील
पोना/अमित साळुखे व संभाजी देविकर यांना निलेश मिठू कदम (रा.नायगाव ता.हवेली जि.पुणे) हा चोरीची मोटार सायकल घेवुन फिरत आहे व त्यानेच श्रीमंत अंबरनाथ दुकानामधील रोख रक्कम चोरी केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. सदर माहिती अमित साळुखे यांनी वपोनि/राजेंद्र मोकाशी व तपास
पथक प्रमुख सपोनि/ राजु महानोर यांना कळवुन त्यांचे आदेशाप्रमाणे निलेश मिठु कदम यास नायगाव येथुन सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने नायगाव व लोणीकाळभोर गावचे हददीतून दोन मोटार सायकली चोरल्याचे तसेच दि.१७/०८/२०२१ रोजी श्रीमंत अंबरनाथ दुकानाचे ड्रावर मधुन रोख रक्कम चोरी केल्याचे सांगीतले.

त्याचेकडे अधिक तपास करून त्याचेकडुन किं.रू.५०,०००/-च्या एकुण दोन मोटार सायकली जप्त करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत.पुढील तपास श्री.जयंत हंचाटे,पोलीस उप-निरीक्षक हे करीत आहेत.
१) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.४३८/२०२१ भा.द.वि.क.३८०
२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.४५८/२१ भा.द.वि.क.३७९
३) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.५९४/२१ भा.द.वि.क.३७९
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा.नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, मा.श्री.कल्याणराव विधाते स.पो.आ. हडपसर विभाग,राजेन्द्र
मोकाशी वपोनि, सुभाश काळे पोनि (गुन्हे), लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी राजु महानोर सपोनि, यांचे सोबत पोहवा/ नरेंद्र सोनवणे, पोना/ अमित साळुखे, संतोष राठोड पोकॉ/राजेश दराडे, निखील पवार, बाजीराव वीर, शैलेश कुदळे यांचे पथकाने केली आहे.