पुणे : सहकारनामा
राजगड पोलीस स्टेशन हद्दीत दि.11/03/2021 रोजी पिस्तूलाचा धाक दाखवून पेट्रोलपंप लुटण्याचा प्रकार घडला होता, याबाबत भा.द.वि कलम 392, 307, 34 तसेच शस्त्रअधिनियम 3(25) नुसार गुन्हा नोंद झाला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पेट्रोल पंपावर असलेल्या CCTV फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणातून आणि गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संतोष नगर, कात्रज, पुणे येथे राहणारा इसम रामधन भागीरथी विश्वकर्मा याच्या राहत्या घरी उत्तर प्रदेशची दोन मुले आली होती व त्यांच्याकडे पिस्टल होते अशी खात्रीशीर माहिती LCB टीमला मिळाल्याने रामधन विश्वकर्मा याचा शोध घेत असताना आज दि.17 मार्च रोजी दत्त नगर चौक, कात्रज पुणे येथून त्यास ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे पूर्ण नाव रामधन भागीरथी विश्वकर्मा (वय, 39 वर्षे, रा. श्री चांदमुल्ला यांचे खोलीत,संतोष नगर, कात्रज, पुणे मूळ राहणार सोहिला,पोस्ट लालगंज,जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे असल्याचे सांगितले व त्याने त्याचे 2 साथीदार राजसिंग उर्फ राजकुमार (वय 20,रा. कबरा,*जि.बस्ती, उत्तर प्रदेश) आणि सुरज कुमार (वय 18 रा. कबरा जि. बस्ती, उत्तरप्रदेश)
यांचेसह मिळून मोटार सायकल क्र.MH 12 QN 9801 यावर जाऊन सदरचा गुन्हा केल्याची माहिती दिली आहे.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी राजसिंग तसेच सुरज कुमार फरार असून रामधन भागीरथी विश्वकर्मा यास ताब्यात घेतले असून पुढील तापसाकामी त्यास राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.
या आरोपींकडून भारती विद्यापीठ पो. स्टे गु. र. न.88/2021 भा. द.वी कलम 307, 34 आर्म ऍक्ट 3,25 हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख सो,
अप्पर पोलीस अधिक्षक मोहिते सो,
पोलिस उपअधीक्षक पाटील सो,
यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अमोल गोरे,
पोना राजू मोमीन, पोशी अमोल शेडगे,
पोशी मंगेश भगत, पोशी अक्षय नवले,
पोशी अक्षय जावळे, पोहवा प्रमोद नवले,
सफो राजेंद्र थोरात, पोहवा ज्ञानेश्वर क्षीरसागर, पोहवा दत्तात्रय तांबे, पोहवा हनुमंत पासलकर, पो ना गुरू जाधव,
पोशी प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.