Crime – सुपे घाटात दरोडा टाकून फरार झालेला ‛मोक्का’तील सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा LCB कडून जेरबंद



|सहकारनामा|

पुणे : मा पोलिस अधिक्षक सो यांनी पुणे ग्रामिण जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढत असताना जुन्या गुन्ह्यातील अनेक गुन्ह्यातील विशेष मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेले गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते .

वरील आदेशानुसार आज दि १७/६/२०२१रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक पुणे सोलापूर महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना दि २६/३/२०१९ रोजी यवत पोलिस स्टेशन हद्दीत  सूपा घाटातील पहिले वळणावर  रात्री  एक ट्रान्सपोर्ट चा ट्रक ३१ टन वजनाचे गहू घेऊन जात असताना सदरच्या ट्रक ला एका कार गाडीने आडवी मारून त्या  ट्रक ला थांबवून सदरचा ट्रक आणि त्याचा ड्रायव्हर ला मारहाण करीत आरोपी यांनी दरोडा टाकला होता. 

सदर २९६/२०१९ भा द वी का कलम ३९५,३६३ (मोक्का)नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरच्या गुन्ह्यात एकूण १० आरोपींची नावे समोर आली होती त्यातील 9 आरोपी यांना काही दिवसातच अटक करण्यात आली होती परंतु एक आरोपी आज पर्यत गेली २ वर्षा पासून फरार होता. 

आज १७/६/२०२१ रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल पोपट कसबे (वय २६ वर्षे रा देसाई इस्टेट , कॅनॉल जवळ  बारामती ता बारामती जि पुणे साध्य रा उरुळी देवाची गाव ता हवेली जि पुणे) हा  एका हॉटेल मध्ये काम करीत असल्याचे बातमीदार कडून समजले. सदर बातमी वरून  उरुळी देवाची गावात प्रवेश करणाऱ्या रोडच्या डावी कडे असणारे हॉटेल समोर त्या ठिकाणी सापळा रचून वरील नाव असलेल्या इसमास ताब्यात घेतले असता त्याने  त्याने वरील गुन्ह्या त्याचे मित्रांसोबत केल्याचे सांगितले.

त्यामुळे सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधिक्षक  मिलिंद मोहिते, दौड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे , पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे पो ना विजय कांचन, पो ना राजू मोमिनपो कॉ धिरज जाधव , पो कॉ अमोल शेडगेपो कॉ मंगेश भगत, पो कॉ दगडू विरकर , म पो कॉ पूनम गुंड यांनी केली आहे .